*परांडा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांच्या भिमानगर येथील अपहरण प्रकरणातील सात आरोपींना जामीन मंजूर*
- परांडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे आठ सदस्य व इतर चार अशा बारा जणांचे भिमानगर (ता.माढा) येथून पिस्तुल,कोयत्याचा धाक दाखवून त्यांना लोखंडी रॉड,कुकरी व लाकडी दांडक्याने मारहाण करून बुधवारी सकाळी झालेल्या अपहरण प्रकरणातील सात ही आरोपींची माढा न्यायालयाने जामीनवर मुक्तता केली आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल होताच माढा तालुक्यात खळबळ उडाली होती.तसेच या गुन्ह्याची माहिती समजताच परिसर हादरून गेला होता.भीतीचे वातावरण पसरले होते.पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेत चोवीस तासाच्या आत पाच आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर उभे केले होते.त्या सर्वांना 29 मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती.त्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.त्यांना ही पोलीस कोठडी सुनावली होती.
आज सोमवारी सर्व आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सर्व सात आरोपींना माढा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
या मुख्य आरोपीमध्ये सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे (वय-४९)रा.वरुड ता.भूम हा व त्याचे साथीदार प्रदीप आजिनाथ पाडुळे (वय-३१),रा.कौडगाव ता.परांडा,समाधान हनुमंत मिस्किन (वय-२६)रा.डोमगाव ता.परांडा,किरण उर्फ लादेन भीमराव बरकडे (वय-३१)रा.बुरुडवाडी ता.भूम, जगदीश महादेव ठवरे-पाटील (वय-२४) रा.कौडगाव ता.परांडा गणेश बबन जगदाळे रा.खासगाव ता.परंडा,परशुराम येडाबा शिंदे रा.साकत ता.परंडा जिल्हा उस्मानाबाद अशी जामीन मंजूर झालेल्या सात आरोपींची नावे आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा