वडोली येथील आम्रपाली मोरे व वैशाली भाग्यवंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
टेंभुर्णी (प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार २०२३/२४ साठी वडोली (ता.माढा) या ग्रामपंचायतीच्या वतीने सौ.आम्रपाली शेखर मोरे व सौ. वैशाली दत्तात्रय भाग्यवंत यांना पुरस्कार देण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह, पारितोषिक, पाचशे रुपयेचा धनादेश असे असून पोलीस पाटील धनाजी काळे-पाटील व मुख्याध्यापक कुंभार सर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पत्रकार सतिश काळे यांनी निवड समितीने सार्थ निवड केले बद्दल निवड समितीचे आभार व्यक्त करून सत्कारमूर्तीचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा देवून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्रित करून आर्थिक चळवळ उभारण्याचे उत्कृष्ट काम करीत आहेत. सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.
आम्रपाली मोरे व वैशाली भाग्यवंत यांनी मनोगत व्यक्त करून पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार निवड समिती म्हणून प्रशासक अमृत ढवळे भाऊसाहेब, ग्रामसेवक नारायण सोनवणे, पोलीस पाटील धनाजी काळे-पाटील, मुख्याध्यापक कुंभार सर, अंगणवाडी सेविका पुष्पा काळे, आशा वर्कर कविता मोरे यांनी काम पाहिले.
यावेळी माजी सरपंच सुखदेव मोरे, माजी उपसरपंच तानाजी गाडे, दत्तात्रय माने, शेखर मोरे, दत्तात्रय भाग्यवंत, नागनाथ मोरे, दयानंद मोरे, सत्यवान मोरे, ऑपरेटर विक्रम मोरे, शिपाई धनाजी बागव आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा