अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त रांझणी येथे विविध महिलांचा सन्मान
कन्हेरगाव (प्रतिनिधी)
दिनांक 31 रोजी राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त रांझणी तालुका माढा येथे अनेक महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या पुरस्कारासाठी रांझणी येथे या पुरस्कारासाठी बँक सखी संगीता ताई पाटोळे, ग्रामसंघाच्या लिपिका अर्चना ताई चव्हाण, शिवनेरी महिला स्वयंसहायता समूहातील अध्यक्ष सचिव उज्वला ताई मगर तसेच शुभांगी ताई यादव जिजामाता महिला स्वयंसहायता समूहातील सदस्य अश्विनी ताई जाधव यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी गणेश पाटील,गावच्या सरपंच चंचलाताई पाटील,उपसरपंच रोहित गायकवाड, माजी सरपंच पांडुरंग माने,संतोष चव्हाण,साहेबराव जाधव,शेख गुरुजी,ग्रामसेवक शेख, सुनिता माने,संगिता पाटोळे,अंकिता चव्हाण,कौशल्या गायकवाड,सविता शेंडगे,सुवर्णा भुई,शोभा चव्हाण,रूपाली जाधव,नंदा सातव,अर्चना लोंढे,स्नेहा देशमुख,विजया चव्हाण,रेखा चव्हाण, अमृता जाधव,सोनल जाधव,सारिका बागल,कल्पना पौळ,सुनिता जाधव,माधुरी चव्हाण आदी उपस्थित होते.शाल,श्रीफळ,ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते यावेळी सीआरपी मुलांणी मॅडम, व आरोग्य विभागाचे डॉक्टर नेहा देशमुख मॅडम, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
यावेळी बँक सखी संगिता पाटोळे,अर्चना चव्हाण,आरोग्य अधिकारी स्नेहा देशमुख यांनी विचार व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा