Breaking

सोमवार, ८ मे, २०२३

मराठवाड्यातील पहिल्या अद्यावत फिरत्या तारंगणाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते उद्घाटन.*



*मराठवाड्यातील पहिल्या अद्यावत फिरत्या तारंगणाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते उद्घाटन.*


*लातूर /प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सूर्यवंशी*           प्रात्यक्षिक शिक्षणासाठी सुप्रसिद्ध असलेल्या स्टीम एज्युकेशन सेंटर येथील मराठवाड्यातील पहिल्या अद्यावत फिरत्या तारंगणाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या अद्यावत तारांगण व टेलीस्कोप शो च्या माध्यमातून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचा अधिक विस्तृत अभ्यास करणे शक्य होणार आहे.
यावेळी आ. विक्रम काळे यांनी स्टीम एज्युकेशन सेंटर, लातूर येथे उभारण्यात आलेल्या सायन्स लँब, मँथ लँब, एरोनॉटिकल लँब, अँस्ट्रोनोमी लँब, रोबोटिक्स लँब आणि लँग्वेज आदी लँबना भेटी देऊन तेथील विस्तृत माहिती घेत संस्थेचे कौतुक केले.

याप्रसंगी स्टीम एज्युकेशन सेंटरचे अध्यक्ष प्रा.ओमप्रकाश झुरुळे, चंद्रकांत झेरिकुंठे,प्रा.अंकुश नाडे,
संतोष बिराजदार, डॉ.युवराज सारणीकर,प्रा.मन्मथ पंचाक्षरी, राम स्वामी, डॉ.महादेव पंडगे, प्राचार्य संतोष आळंदकर,डॉ.रविकिरण बिराजदार,असिफ शेख, कल्पना झुरुळे, प्राचार्या पूनम पाठक, प्रा.राजकुमार जाधव, बाबासाहेब भिसे, डॉ.अशोक मोटे, तानाजी मुडे, निकिता चेटवानी,बालाजी जाधव, तानाजी कदम आणि सोमेश लोहारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा