Breaking

मंगळवार, ६ जून, २०२३

मानव विकास परिषद उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी प्रमोद डोंगरे यांची निवड.



मानव विकास परिषद उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी प्रमोद डोंगरे यांची निवड.


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.


तुळजापूर: मानव विकास परिषद (HUMAN DEVLOPMENT COUNCIL) महाराष्ट्र भर कार्यरत असून उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कार्य वाढविण्यासाठी लघु व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच आरटीआय अभ्यासक प्रमोद डोंगरे यांच्या कार्याची दखल घेऊन  परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांनी उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष पदाची डोंगरे यांना निवडीचे पत्राद्वारे जबाबदारी दिली आहे.
      सदरील निवड पत्रामध्ये म्हटले आहे.की मानव विकास परिषद शोषित, श्रमिक, पोलीस कोठडीत मृत्यू, बेकायदेशीर अटक, शोषण, गुलामगिरी,दहशत, मागासवर्गीयावर होणारा अन्याय त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयातून होणारी पिळवणूक, मानवी हक्कांचे उल्लंघन, शासकीय अधिकाराचा गैरवापर, भांडवल शाहीकडून पैशाच्या व सत्तेच्या व सत्तेच्या जोरावर शासकीय यंत्रणेचा स्वार्थासाठी होणारा वापर हे सर्व समुळनाश करण्यासाठी तसेच सर्व सामान्यांचे संविधान मानवी हक्कांसाठी मानव विकास परिषद च्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील असल्याचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांनी नमूद केले आहे.
सदरील कार्याची सामाजिक बांधिलकी, निस्वार्थ वृत्ती आणि प्रमाणिकपणा ह्यावरून मानव विकास परिषदेला जनतेकडून प्रचंड समर्थन मिळत आहे.
ह्या महान कार्यात प्रमोद हणमंत डोंगरे यांनी सहभाग घेतला आहे.
     निवडीबद्दल प्रमोद डोंगरे यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा