*माढा तालुक्यातील बावी, तुळशी, कूर्डू, अंबाड व पिंपळखुटे इ. गावांचा सिना-माढा योजनेत समावेश.* खा.निंबाळकर
माढा तालुक्यातील बावी, तुळशी, कूर्डू, अंबाड, पिंपळखुटे गावांचा सिना-माढा योजनेत समावेश.... खासदार निंबाळकर
टेंभुर्णी प्रतिनिधी :- माढा लोकसभेचे पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे माढा तालुक्यातील बावी, तुळशी, कुर्डु, अंबाड, पिंपळखुटे या गावांचा सिना माढा उपसा जलसिंचन योजनेत समावेश करण्यात आला आहे. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील वरील गावांचा समावेश करून अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला आहे.
पूर्वी या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या गावांमध्ये, ठिबक सिंचनामुळे होत असलेल्या पाण्याची बचत लक्षात आणून देऊन होणाऱ्या पाण्याच्या बचतीचा उपयोग वरील गावाच्या सिंचनासाठी करण्यात येणार आहे.
माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न करून वरील गावांचा समावेश करण्यात यश मिळवले त्यामुळे दुष्काळाचा प्रश्न कायमचा मिटला जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा