Breaking

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३

ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल मध्ये रवींद्रनाथ टागोर जयंती साजरी


ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल मध्ये रवींद्रनाथ टागोर जयंती साजरी


टेंभुर्णी (प्रतिनिधी)
 स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टेंभुर्णी येथे रवींद्रनाथ टागोर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे हे होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेच्या शिक्षिका स्नेहल अनपट यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. सूत्रसंचालन अमर भानवसे यांनी केले. आभार तेजश्री सुतार यांनी मानले. यावेळी गणेश केचे म्हणाले की ट्विंकल स्टार ही शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच अग्रेसर असते. पीआरपीचे जिल्हा अध्यक्ष निलेश खरात म्हणाले की महामानवाच्या विचारावर मुलांचे संस्कार नेहमीच झाले पाहिजे असे संस्कार करणारी शाळा म्हणजे ट्विंकल स्टार होय. संस्थेचे अध्यक्ष गाडेकर यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या बद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी लिहिलेल्या कविता लघुकथा कादंबऱ्या इत्यादी साहित्याची माहिती विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की आपला मुलगा बॅरिस्टर झाला पाहिजे, परंतु ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.

यावेळी गणेश केचे, निलेश खरात, पीआरपीची शहराध्यक्ष संदीप जगताप, पी आर पी चे तालुका अध्यक्ष शशिकांत पांढरे, शिवशंकर हॉटेलचे बाळासाहेब चव्हाण, शाळेच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका यशोदा गाडेकर, शाळेच्या प्रिन्सिपल रेखा गाडेकर, संचालक विलास गाडेकर, सचिव अर्चना गाडेकर, पत्रकार धनंजय भोसले व सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा