Breaking

सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

निर्जन आणि अप्रकाशित धबधब्यावर पोहायला गेलेल्या कॉलेज तरुणाचा बुडून मृत्यू


निर्जन आणि अप्रकाशित धबधब्यावर पोहायला गेलेल्या कॉलेज तरुणाचा बुडून मृत्यू



महाड (प्रतिनिधी) 
महाड तालुक्यातील शिवाजी वाळण कोंड येथील निर्जन आणि प्रकाश झोतात  नसलेल्या धबधब्यावर पोहायला गेलेल्या सात महाविद्यालयीन तरुनांपैकी  एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज महाड येथे घडली.

महाड तालुक्यातील दहिवड गावचा रहिवासी असणारा स्मित घाडगे हा वीस वर्षीय युवक जवळच असणाऱ्या शिवाजी वाळण कोंड येथील धबधब्यावर गावातील अन्य सात मुलांबरोबर पोहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचा मोठा भाऊ देखील त्याच्याबरोबर होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने या सोबत असणाऱ्या सात मुलांपैकी स्मित घाडगे या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिवाजी वाळन कोंड येथील धबधब्यावर दुपारी बाराच्या सुमारास घडली.
शिवाजी वाळन कोंड येथील निर्जन स्थळी असणाऱ्या धबधब्यावर पोहायला गेलेले दहिवड गावचे हे युवक हे हे पाहण्यात पोहता असताना स्मित घाडगे याचा मोठा भाऊ हा पाण्यात बुडत असताना आपल्या मोठ्या भावाला वाचवताना घाडगे यांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने दहिवड गावावर शोककळा पसरली आहे शिवाजी वाळन कोंड येथील स्मित घाडगे चा मृतदेह काढण्यासाठी एडवेंचर सोल या संस्थेने अथक मेहनत घेतली अखेर धबधब्यातील स्मित घाडगे यांचा मृतदेह शोधून तो महाड ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी आणण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे हे याबाबत पुढील तपास करीत आहेत. याबाबत शोध कार्यात भाग घेणारे ॲडव्हेंचर सोलचे विशाल खांबे, समीर विचारे, प्रसाद देवरुखकर, यश पवार, कुमार केंद्रे, व्यंकोजी लुष्टे, रोशन सावंत, प्रवीण सकपाळ, संकेत मल्लक, चंद्रकांत सावरटकर, इत्यादीसह एन डी आर एफ चे पथक देखील  हा मृतदेह शोधण्यात कामगिरी बजावली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा