*अरण येथे ह.भ.प बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती युवकचे एक दिवशीय संस्कार शिबिर संपन्न*
टेंभुर्णी/ प्रतिनिधी
ह भ प बंडातात्या कराडकर संस्थापक अध्यक्ष व्यसनमुक्ती युवक चे संस्कार शिबिर आयोजित आज सकाळी 11 वा करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माढा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बंडू नाना ढवळे पाटील उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून दिग्विजय जाधव सर यांनी मार्गदर्शन केले.सुरुवातीला संत सावता महाराज यांच्या समाधीचा अभिषेक माढा तालुका व्यसनमुक्ती युवक संघाचे अध्यक्ष व शिव विचार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय दादा खटके पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .
आजचा तरुण व समाजामध्ये व्यसनाबाबत असलेले विविध कारणे व व्यसनामुळे होणारे बरबादी त्याचे आर्थिक सामाजिक मानसिक आशा होणाऱ्या विविध त्रासाचे परिणामाचे उखलन करत अतिशय चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन दिग्विजय जाधव सर यांनी केले नंतर माढा तालुका व्यसनमुक्ती युवकचे कार्य गेले तेरा वर्षापासून सतत व्यसनमुक्त समाज तरुण कसा राहील याबाबत माढा तालुका व्यसनमुक्तीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात कार्य करण्यात आले त्याचा अनुषंगाने गेले 13 वर्षापासून 31 डिसेंबर या दिवशी दारू नको दूध प्या आणि तंबाखू विरोधी दिन हा बंडातात्या कराडकर यांचा मार्गदर्शनाखाली उपक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात राबविला जातो हे करत असताना माढा तालुक्यातील कित्येक युवक वडीलधाऱ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम व प्रापंचिक होणारे नुकसान याची समज देऊन त्यांना त्यापासून परावर्त करण्याचे काम केले गेले बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गडकोट मोहिमा असतील त्या ठिकाणी असणारे संस्कार शिबिर असतील हे सगळे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यातून बहुसंख्य युवक एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात करण्याचे काम करतात व शिव विचार प्रतिष्ठानचे आजवर केलेला कार्याचा उल्लेख सचिव सचिन पवार यांनी केला.
यावेळी माढा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बंडू नाना ढवळे यांनी बोलत असताना आम्ही प्रत्येक वेळेस महाराष्ट्रातील थोर सांप्रदायिक विचारवंत यांची सांप्रदायिक क्षेत्रामध्ये अतिशय मोठी ताकद आहे मानाचे स्थान आहे अशा बंडातात्या कराडकर यांच्या विचाराचा प्रभावाने प्रभावित होऊन आम्ही त्यांच्याकडे आकर्षले गेलो व आजवर त्यांचे विविध ठिकाणी असणारे उपक्रम शिबिर वेगवेगळ्या असणाऱ्या मोहिमा यामध्ये मोठ्या आनंदाने सहभागी होण्याचे काम आम्ही करत आहोत असे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माढा तालुक्यातील नवीन निवडी करण्यात आल्या यावेळी माढा तालुका व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प.सागर महाराज क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी बेंबळे गावचे डॉ भीमराव पवार यांची निवड करण्यात आली सचिव म्हणून सागर खटके यांची निवड करण्यात आली .यानंतर दुपारच्या सत्रामध्ये नैसर्गिक शेती या विषयावर शरद शिंदे समाधान पाटील यांनी मार्गदर्शन केले सावता महाराजांचे चरित्र तात्यासाहेब महाराज यांनी सांगितले यानंतर कार्यक्रमाचा समारोप हा प्रार्थनाने व देशभक्तीपर गीताने करण्यात आला. यावेळी उपस्थित व्यसनमुक्त युवक संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक जाधव सोलापूर जिल्हा व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष विजय परडे पाटील कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागेश बापू खटके पाटील गणेश व्यवहारे समाधान पराडे शेतकी अधिकारी विजय खटके योगेश पराडे डॉ अवध जाधव सौरभ खटके सुजित खटके बाळासाहेब खटके नामदेव व्यवहारे हनुमंत ढवळे बाळासाहेब माने चंदू करंडे आप्पा करंडे गोटू खटके शैलेश खटके विशाल इंदलकर कैलास माने विशाल चव्हाण अक्षय ढवळे अक्षय खटके प्रसाद खटके वाघोबा माने सागर माने सावळाराम खटके घाडगे सर मयूर ताटे गणेश कांबळे, ओमप्रकाश जठार, प्रकाश भोंग साहेब, नागेश जाधव,सौरभ व्यवहारे, सापटणेचे संजय शिंदे बबलू व्यवहारे आणि माढा तालुका तून आलेले व्यसनमुक्त युवक संघटनेचे आणि शिवविचार प्रतिष्ठान चे सर्वच सदस्य आणि भक्तगण यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी राजनंदिनी खटके पाटील हिने अतिशय चांगल्या प्रकारे केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा