*श्री गणपती फार्मसीचे विद्यार्थी राज्यात दुसरे*
मौजे अकोले खुर्द तालुका माढा येथील श्री गणपती इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युिटिकल सायन्सेस अँड रिसर्च, टेंभुर्णी येथील द्वितीय वर्ष डी फार्मसीतील श्रीकांत भोसले , आदित्य साळुंखे यांनी हृदयाचे कार्य व गौरव बाणकर शुभम दिवटे यांनी न्यूरॉन चे कार्य यांचे मॉडेल बनवले. कोल्हापूर येथील जेनेसिस इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयात सहभाग घेतला. त्यामध्ये महाविद्यालयातील गौरव बनकर व शुभम दिवटे यांनी स्टेट लेवल मॉडल मेकिंग कॉम्पेटिशन मध्ये दुसरा क्रमांक मिळवल्याचे माहिती प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी दिली व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यामध्ये श्री गणपती फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्य पातळी वर दुसरा क्रमांक मिळवायचा अभिमान असल्याचे गौरवपूर्ण उदगार संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे यांनी काढले. दोन्ही विद्यार्थ्यांना प्रा. मोनिका माळी यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी श्री गणपती फार्मसचे अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्रा. धनश्री करंडे, प्रा. कोमल यादव, प्रा. आशिष जाधव प्रा.रूपाली राऊत, प्रा.स्वाती पाटील व इतर प्राध्यापक वर्गानी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा