बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडीच्या तालुका संघटक पदी सौ प्रतिभा मडके....
श्रीगोंदा- नितीन रोही.. बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकारणी जाहीर होत असून श्रीगोंदा तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याच्या कार्यकारणी श्रीगोंदा येथील जिल्ह्याच्या महिला जिल्हाप्रमुख मनीषा काळे ह्या सध्या स्वतःच्या तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात महिलांचे संघटन उभे करीत आहेत तसेच विविध महिलांना त्यांच्या सोयीनुसार पक्षाचे पदभार देत आहेत. सर्व जिल्ह्यातील महिलांना महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार श्रीगोंदा तालुक्या सह जिल्ह्याची महिला कार्यकारिणी जाहीर करीत आहेत. त्यांना मोलाची साथ अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख सचिन जाधव, अहमदनगर जिल्हाप्रमुख अनिल शिंदे हे देत आहेत
जिल्हाप्रमुख मनीषा काळे यांच्या हस्ते पारगाव येथील रहिवाशी असलेली थोड्याच कालावधीमध्ये नावारूपाला येऊन संघटन करणारी एक तरुण तडफदार महिला नेतृत्व करणारी सौ.प्रतिभा किरण मडके यांची श्रीगोंदा तालुका संघटक पदी निवड करण्यात आली आणि त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी श्रीगोंदा तालुका प्रमुख नंदकुमार ताडे, जिल्हा उपप्रमुख संतोष शिंदे (सरपंच), यांच्या सह श्रीगोंदा नगरीचे शिंदे गटाचे नगरसेवक, डॉ.संतोष हिरडे,मा.नगरसेवक दादा औटी, पत्रकार नितीन रोही, किरण मडके, बाळासाहेब दांडेकर,आनंदा दांडेकर, धनु दांडेकर, सुरेश दांडेकर, चंद्रकांत वडवकर, विशाल दांडेकर यांच्या सह आदी शिवसैनिक कार्यकर्ते यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले. सौ.मडके यांना श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा