विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संतोष डिग्रजे आदर्श कार्यकारी संचालक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित।...
बेंबळे। प्रतिनिधी
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.पिंपळनेर चे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांना सन 2023 चा आदर्श कार्यकारी संचालक पुरस्कार दि.12 ऑक्टोबर,2023 रोजी मान्यवरांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करुन सन्मानित करण्यात आले..
सहकार क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलणा-या कर्तृत्ववान प्रयोगशील व कुशल मॅनेजमेंट करत असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार देवून प्रत्येक वर्षी गौरविण्यात येते. सन 2023 सालचा आदर्श कार्यकारी संचालक पुरस्कार विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष नाभिराज डिग्रजे यांना जाहीर करण्यात आला होता. सदर पुरस्काराचे वितरण 12 ऑक्टोबर, 2023 रोजी सायं.6 वा. हॉटेल ताज प्रेसिडेंट, मुंबई येथे मा.खा.सुनिल तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सदर प्रसंगी व्यवस्थापकीय संचालक निमेशजी माहेश्वरी व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कामगार युनियनचे अध्यक्ष अनिल वीर उपस्थित होते.
चौकट-
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ.बबनराव शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याने अल्पावधीत चौफेर प्रगती केलेली असून राज्य व देश पातळीवरील 24 पुरस्कार प्राप्त केले आहेत. काखान्याने सातत्याने सभासद, ऊस पुरवठादार व शेतक-यांचे हित जोपासलेले आहे.कारखान्याने ऊस गाळप, साखर उत्पादन व उपपदार्थ उत्पादनात उच्चांक प्रस्थापित केलेले आहेत. आदरणीय आ.बबनदादा शिंदे हे साखर उद्योगातील गाढे अभ्यासक असून त्यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या नियोजनात मला मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करण्यास मिळत आहे हे माझे सौभाग्य समजतो.तसेच मला सहकार क्षेत्रातील मानाचा पुरस्कार देऊन गौरविल्या बद्दल मी सर्वांचा मनस्वी आभारी आहे.
– संतोष डिग्रजे, कार्यकारी संचालक
फोटो .... आदर्श कार्यकारी संचालक म्हणून पुरस्काराने सन्मानित होत असताना संतोष डिग्रजे। ......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा