*श्री.शिवराम शिंदे यांना मराठवाडा क्रीडा रत्न पुरस्कार प्रदान*
*औसा प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर सूर्यवंशी* शिवाजीराव वाकडे पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व मराठा प्रतिष्ठान धावरी तालुका लोहा जिल्हा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी सन 2023 मध्ये औसा तालुक्यातील श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे माध्यमिक विद्यालय,फत्तेपूर येथील उत्कृष्ट क्रीडा शिक्षक श्री. शिवराम विष्णू शिंदे यांना मराठवाडा क्रीडा रत्न पुरस्कार आज मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण दिनांक:- 2 ऑक्टोबर 2023 रोजी लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणी लोह्याचे विद्यमान आमदार श्री. श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते श्री. शिवराम विष्णू शिंदे यांना प्रदान करण्यात आला.श्री शिवराम शिंदे यांना मराठवाडा क्रीडारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल औसा गटशिक्षणाधिकारी साहेब, संस्था अध्यक्ष सचिव तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच माजी केंद्रप्रमुख श्री सावंत साहेब, पांचाळ सर,श्री चव्हाण सर,श्री यादव सर,श्री काजळे सर, जाधव सर, गरड सर, व काका सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे.
औसा तालुक्यातील शिक्षण व क्रीडा क्षेत्रातून श्री शिवराम शिंदे सर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा