Breaking

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

औसा शिक्षक पतसंस्थेकडून मयत सभासदांच्या कुटुंबास प्रत्येकी १० लाख रु. ची आर्थिक मदत*



*औसा शिक्षक पतसंस्थेकडून मयत सभासदांच्या कुटुंबास प्रत्येकी १० लाख रु. ची आर्थिक मदत*

*औसा प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सूर्यवंशी* औसा:-  औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे मयत शिक्षक सभासद कै. दोडके कुसुम मार्तंड व  कै. भातमोडे यशवंत सिताराम यांच्या वारसदारांना प्रत्येकी १० लाख रु. औसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांच्या हस्ते दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ रोजी धनादेशाव्दारे देण्यात आली.
             या कार्यक्रमाला औसा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गोविंद राठोड, संस्थेचे पदाधिकारी, सभासद  उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे पुढे बोलताना म्हणाले की, संस्थेची रक्कम विमा कंपनीला न देता संस्थेतच ठेवून सभासद रद्द केल्यास या योजनेत जमा केलेली संपूर्ण रक्कम परत करणारी व सभासद मयत झाल्यास या योजनेतील जमा रक्कमेच्या व्याजावर मयत सभासदांचे संपूर्ण कर्ज माफ व मयत सभासदांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आर्थिक मदत करणारी ही योजना मी पहिल्यांदाच पाहिली त्यामुळे ही योजना इतर पतसंस्थांना आदर्श देणारी असून मी यापुढे वेळेप्रसंगी या योजनांचा प्रसार व प्रचार करणार असल्याचे गौरव उद्गार काढून सर्व संचालक मंडळाचे यावेळी त्यांनी अभिनंदन केले.
            कर्ज जीवन हमी योजनेत सभासदांनी ४० हजार रु. जमा केल्यास १२ लाख रु. व ३० हजार रु. जमा केल्यास १० लाख रु. आणि डी. सी. पी. एस. शिक्षक सभासदांना इतर सभासदांपेक्षा वाढीव दीड लाख रु. देणारी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत आतापर्यंत ४६८ सभासदांनी ३० हजार रु. व ३४० सभासदांनी ४० हजार रु. जमा केले असून आजरोजी एकूण २ कोटी ८८ लाख रु. जमा झाले आहेत. या योजनेत आतापर्यंत ९ मयत सभासदांचे कर्ज ४९ लाख ९५ हजार रु. निरंक करून २३ लाख ९८ हजार रु. लाभाची रक्कम त्यांच्या वारसदारांना वाटप केली असून यावर्षी २ मयत सभासदांचे २० हजार रु. कर्ज निरंक करून १९ लाख ८० हजार रु. लाभाची रक्कम धनादेशाने देण्यात आली. या योजनेचा लाभ कै. शेळके विनायक राजाराम, कै. गायकवाड हरिश्चंद्र शंकरराव, कै. शेळके भरत आण्णाराव, कै.चंदेले बेलाबाई जडावसिंग, कै. जाधव धनंजय मारुतीराव, कै. हिप्पळगे सुनिल शिवाजीराव, कै.राठोड प्रभू हरिभाऊ,  कै.भातमोडे यशवंत सिताराम, कै.दोडके कुसुम मार्तंड या मयत सभासदांना देण्यात आला. आणखीन संस्थेचे २ मयत सभासद कै. जाधव राजेंद्र रूपा व कै.पडसलगे मुक्तेश्वर भिमाशंकर यांना लाभ द्यावयाचे राहिले असून या योजनेत उर्वरित सर्व सभासदांनी योजनेची संपूर्ण रक्कम जमा करून या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन महादेव खिचडे यांनी केले. 
              सूत्रसंचालन संस्थेचे व्हा. चेअरमन हरीश आयतनबोने यांनी तर आभार संस्थेचे सचिव संजय जगताप यांनी मानले. या कार्यक्रमाला संचालक युसुफ पिरजादे, मधुकर गोरे, रमेश जाधव, धीरजकुमार रुकमे, महेश कांबळे, अमोल शेळके, दिपक डोंगरे, संचालिका मंदाकिनी माने, संगीता कानडे व शिक्षक सभासद उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा