वासंती रेपाळ यांना राज्य स्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार.
टेंभुर्णी/प्रतिनिधी
पंढरपूर येथील रहिवासी व सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवार मळा चिंचोली भोसे येथे कार्यरत असणाऱ्या सौ वासंती भारत रेपाळ यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार शनिवार तारीख 18 रोजी पुणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे श्रीमंत फत्तेसिंह राजे भोसले व उपायुक्त महिला व बालकल्याण श्रीमती सुवर्ण पवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते यावेळी रेल्वे व्यवस्थापक डॉक्टर मिलिंद हिरवे शिक्षण संचालक शरद गोसावी लेखक अंबादास शिंदे सामाजिक कार्यकर्ते वैभव गीते अध्यक्ष संतोष गायकवाड सचिव सत्यजित जानराव व कुर्डूवाडी येथील उत्कर्ष मोरे हे उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा