Breaking

बुधवार, ३ जानेवारी, २०२४

जनसंवाद कविता विनोद सराफ फाउंडेशन आणि ऑरगॅनिक यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड परिसराला रुग्णवाहिका भेट


जनसंवाद कविता विनोद सराफ फाउंडेशन आणि ऑरगॅनिक यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड परिसराला रुग्णवाहिका भेट


महाड 
महाड औद्योगिक वसाहती मधील विनती ऑर्गनिक लिमिटेड कंपनी, मिसेस कविता विनोद सराफ फाउंडेशन, मुंबई यांच्या तर्फे किल्ले रायगड विभागातील नागरिकां करीता रुग्णवाहिका देण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका जनसंवाद रुरल डेव्हलपमेंट अँड वेल्फेअर असोसिएशन या संस्थेकडे देण्यात आली असून मंगळवारी कंपनीच्या प्रांगणामध्ये कंपनीचे प्रमुख व्यवस्थापक महेश पुरोहित यांच्या हस्ते ही रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली. यावेळी रायगड पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. 
ऐतिहासिक किल्ले रायगडावर दरवर्षी लाखो पर्यटक शिवभक्त येत असतात शिवाय शैक्षणीक सहली देखील मोठ्या प्रमाणात येतात. यापूर्वी अनेकजण गड चढताना किंवा उतरताना अपघात झाले आहेत. रायगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या वाडी वस्त्या दुर्गम भागात आहेत. यामुळे त्यांना पाचाड किंवा महाड येथे उपचारासाठी दाखल व्हावे लागते. याकरिता खाजगी वाहनांशिवाय पर्याय नाही. ही गरज जनसंवाद चे अध्यक्ष निलेश पवार यांनी जाणून घेत कंपनीकडे रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी म्हणून मागणी केली. कंपनी व्यवस्थापनाने देखील ही मागणी सकारात्मक दृष्टीने मान्य करत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. 
 ही  रुग्णवाहिका मंगळवारी संस्थेकडे सुपूर्त करण्यात आली. याप्रसंगी कंपनीचे प्रमुख व्यवस्थापक महेश पुरोहित, जनसंवाद डेव्हलपमेंट अँड वेल्फेअर असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष निलेश पवार , पत्रकार चंद्रकांत कोकणे, पत्रकार उदय सावंत, पत्रकार मिलिंद माने, प्राइड इंडिया संस्थेचे प्रभाकर सावंत, कमलेश कोरपे, रायगड वाडीचे अमर सावंत, दिलीप मुजुमले, प्रभाकर शिंदे, शेखर पाटील, संतोष गायकवाड, देविदास गायकवाड, लामजे, इस्माईल हूर्जुक, शिवाजी पिसाळ, कंपनीचे अधिकारी कुलकर्णी, कृष्णा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कंपनीच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमातून मिसेस कविता सराफ फाउंडेशन तर्फे रायगड वाडीतील ग्रामस्थांना अध्ययवत रुग्णवाहिका प्रदान करण्यात येत असताना आपल्याला मनस्वी आनंद होत असल्याचे पुरोहित या वेळी म्हणाले, ही सेवा चिरकाल टिकावी यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे असेही सांगितले. जनसंवाद संस्थेचे काम ग्रामीण भागामध्ये अत्यंत निस्वार्थी भावनेतून होत असून संस्थेचे अध्यक्ष निलेश पवार व रायगड परिसरातील ग्रामस्थांच्या विनंतीवरून कंपनीच्या व्यवस्थापकाने सुसज्ज रुग्णवाहिका प्रदान करण्याचा निर्णय घेतला. आज ही रुग्णवाहिका ग्रामस्थांना सुपूर्त करताना आपल्याला मनस्वी आनंद होत असल्याचे  निलेश पवार यांनी सांगितले. यावेळी प्रभाकर सावंत, चंद्रकांत कोकणे, यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा