कुर्डवाडी शहरांमध्ये क्रांतीज्योती सावित्री माई फुले यांची जयंती उत्साहात साजरी. .............
*सावित्रीबाई फुलेंच्या आदर्श विचाराने जनजागृतीच्या शिक्षणाचे कार्य पत्रकारच निस्पृहपणे करीत आहेत...प्रा.नागन्नाथ माळी सर...*
*कुर्डुवाडीत सावित्रीबाई फुले जयंती उत्सव मंडळ व क्रांतीसुर्य मित्र मंडळाचे वतीने उत्साहात साजरी....*
*कार्यक्रमात पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा सत्कार व सन्मान....*
कुर्डुवाडी,अरुण कोरे,(प्रतिनिधी )
आजच्या धकाधकीच्या आयुष्यातही पत्रकारच सावित्रीबाई फुलेंच्या आदर्शाने जनजागृतीच्या शिक्षणाचे निस्पृहपणे खरंखुरं कार्य करत करीत असल्याचे प्रतिपादन प्रा.नागन्नाथ माळी सर यांनी केले.
आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित पत्रकार गौरव कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक डॉ.विलास मेहता तर प्रमुख पाहुणे म्हणून संतसेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.जयंत करंदीकर व ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे उपस्थित होते.
प्रथम डॉ.जयंत करंदीकर,डॉ.विलास मेहता,ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे,माजी सैनिक आदीनाथ बोबडे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त पुतळ्यास अभिवादन करून व पत्रकार दिनाचे औचित्य साधून कुर्डूवाडी शहरातील सर्व वर्तमानपत्राचे पत्रकार बंधू यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख धर्मवीर धनंजय डिकोळे डॉक्टर विलास मेहता डॉक्टर जयंत करंदीकर समीर मूलाणी लक्ष्मण भोंग मिलिंद कराडे संजय गोरे अरविंद पवार प्रकाश गोरे माजी सैनिक बोबडे सूनिल भंडारे कुमार व्यवहारे हरी छापेकर तसेच कुर्डूवाडी शहरातील मान्यवरांच्या शुभ हस्ते उपस्थित पत्रकारांना डायरी व पेन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी कुर्डूवाडी शहरातील सर्वच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते समता परिषदेचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भुजबळ आबा खारे, माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक डॉक्टर वकील व व्यापारी यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून पत्रकार बंधूंचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माननीय श्री विशाल आप्पा गोरे तसेच हंबीराव गोरे मेंजर अतूल गोरे सर, मुन्ना माळी औदुंबर सुतार सुधीर गाडेकर तसेच ज्येष्ठ समाज बांधव व पत्रकार यांच्या शुभहस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून कुर्डूवाडी शहरांमध्ये जल्लोषात सावित्रीबाईंची जयंती साजरी करण्यात आली सूत्रसंचालन श्री नागनाथ माळी सर व आभार प्रदर्शन श्री प्रकाश आतकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ,संतोष खारे व अक्षय खारे गणेश शेजाळ अंबादास थोरात संजय आदलिंगे प्रकाश झुंडरे बाळासाहेब चौधरी अमित शिंदे महात्मा फुले जयंती उत्सव मंडळ कुर्डूवाडी व क्रांतीसुर्य मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा