Breaking

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठान निमित्त बेंबळे येथे भव्य कार्यक्रम संपन्न


अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठान निमित्त बेंबळे येथे भव्य कार्यक्रम संपन्न 


बेंबळेl प्रतिनिधी                     

          सोमवारी 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त बेंबळे येथे भव्य स्वरूपात विविध कार्यक्रम संपन्न करण्यात आले.यानिमित्त 21 जानेवारी रोजी गावातील रस्ते, गल्ली व विमलेश्वर तसेच श्रीराम श्री गणेश व श्री विठ्ठल मंदिराची स्वच्छता करण्यात आली ,सर्व मंदिरे फुले व विद्युत रोषणाईने सुशोभित करण्यात आली.  

सोमवारी सकाळी श्रीराम अक्षदा कलश ,रामायण ग्रंथ व प्रतिमेची पालखीतून भव्य नगर प्रदक्षिणा काढण्यात आली, याप्रसंगी गावातील रस्त्यावर रांगोळ्या काढून फुलांचे सडे टाकण्यात आले होते, ठीक ठिकाणी महिलांनी श्रीराम पालखीची  पूजा केली ,टाळ मृदंग आणि वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत व जय श्रीरामाच ा जयजयकार करत नगर प्रदक्षिणा संपन्न झाली, यावेळी सर्वत्र भगवेध्वज फडकत होते लहान थोर मंडळींनी भगवी वस्त्रे परिधान करून भगवे वातावरण निर्माण केले होते, दुपारी 12:20 पर्यंत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला व त्यानंतर श्रीरामाच्या जयघोषात राम लक्ष्मण व सीतामाई यांच्या मूर्तीवर भव्य पुष्पवृष्टी करण्यात आली, याप्रसंगी हजारो नागरिक उपस्थित होते नंतर सरपंच विजय पवार यांचे हस्ते महाआरती करण्यात आली, या संपूर्ण सोहळ्याचे पौरोहित्य वाचस्पती भविष्यतज्ञ ग्रामजोशी  संजूदेव जोशी व राजूदेव संत यांनी केले ,सायंकाळी मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा