यशस्वी होण्यासाठी श्रीकृष्णासारखा सल्लागार निवडणे आवश्यक .......शंकर कोरके
बेबळे । प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करून निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जीवनात महाभारतातील कृष्णासारखा सल्लागार- मार्गदर्शक निवडणे भाग्योदयकारक ठरते, आपले आई ,वडील व शिक्षक हे मर्यादित काळापर्यंत मार्गदर्शक असतात . जीवनात ध्येय साध्य करण्याच्या मार्गात अनेक सल्लागार भेटतात अशावेळी श्रीकृष्णासारखा सल्लागार निवडावा अन्यथा शकुनी मामा सारख्या मार्गदर्शक सल्लागारामुळे कौरवाप्रमाणेच आपली देखील अधोगती होऊन अपयश आल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक पदी निवड झालेले शंकर पांडुरंग कोरके यांनी विमलेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये व्यक्त केले
आहे. बेंबळेतील विमलेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी शंकर कोरके आपले विचार व्यक्त करत होते अध्यक्ष स्थानी बापूसाहेब पवार होते. याप्रसंगी कोरके यांनी उदात्त ध्येय समोर ठेवून व सकारात्मक विचारसरणी आत्मसात करून अखंड प्रयत्न केल्यास ध्येय साध्य निश्चित होते असेही मार्गदर्शन केले. कुमारी सानवी भोसले समृद्धी बाड व सृष्टी मिटकल यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी समायोचीत विचार व्यक्त केले, या कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक गोविंद भोसले प्राचार्य स्वाती पाटील संचालक यशवंत भोसले नागेश मस्के माऊली पवार पत्रकार सिद्धेश्वर शिंदे तात्यासाहेब पवार राज्य ग्रामसेवक संघटनेचे सल्लागार लक्ष्मण गळगुंडे आदी मान्यवरासह शिक्षक प्राध्यापक विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
चौकट.....
बेंबळे ग्रामपंचायतच्या वतीने कोरके यांचा जाहीर सत्कार......
पोलीस निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल बेंबळे ग्रामपंचायतच्या वतीने शंकर कोरके यांचा सरपंच विजय पवार यांचे हस्ते ग्रामपंचायत कार्यालया समोर येतोचित सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सरपंच कैलास भोसले चेअरमन संजय पवार पोपट अनपट गोरख अनपट समाधान भोसले लक्ष्मण गळगुंडे एकनाथ भोसले सिद्धेश्वर शिंदे अनेक प्रतिष्ठित मान्यवर तसेच कर्मचारी व अनेक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पूर्वी शंकर कोरके यांची बेंबळे नगरीतून घोड्यावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
चौकट.....
**मुकुंद रामदासी यांचा सन्मान**
टेंभुर्णी पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी येथील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार मुकुंद रामदासी यांची निवड झाल्याबद्दल बेंबळे ग्रामपंचायत व विमलेश्वर विद्यालय या दोन्ही ठिकाणी आज त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत यथोचित सन्मान करण्यात आला. ......"माझ्या निवडी बद्दल माहित माझा गावातील सन्मान म्हणजे माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे; सर्वांचे हे ऋण मी लेखणीच्या माध्यमातून उतराई होऊन गावचा लौकिक सतत वाढवण्याचा प्रयत्न करीन असे प्रतिपादन मुकुंद रामदासी यांनी यावेळी सत्कारास उत्तर देताना केले".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा