Breaking

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

निमगाव चे पत्रकार भाऊराव शिंदे यांच्या दुसऱ्या मुलाने ही मारली बाजी....विजय शिंदे यांची तलाठी पदावर निवड*



*निमगाव चे पत्रकार भाऊराव शिंदे यांच्या दुसऱ्या मुलाने ही मारली बाजी....विजय शिंदे यांची तलाठी पदावर निवड*
टेंभुर्णी /प्रतिनिधी
     निमगाव ( टें)
 या.माढा येथील विजय भाऊराव शिंदे यांची
तलाठी पदावर निवड झाली आहे महाराष्ट्र शासनाने सरळ सेवेच्या परीक्षा घेण्यात आली होती सोलापूर जिल्हा धिकारी यांनी अंतिम निवड यादी प्रसिद्ध जाहीर केली असून सोलापूर जिल्ह्यात 10व्यानंबर मिळवत त्याने हे यश मिळवले आहे

त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा निमगाव ( टें) येथे माध्यमिक शिक्षण नूतन विद्यालय कुडुवाडी ज्युनिअर कॉलेज कर्मवीर भाऊराव पाटील पंढरपूर येथे तर बी एसस्सी अॅग्रीची पदवी त्यांनी राहुरीकुषी विद्यापीठातुन मिळवली आहे त्याची निवड जाहीर होताच त्याचे मिञमंंडळाकडून गुलालाची मुक्त उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली
त्याला आईवडील व अहमदनगर  येथील जिल्हा परिषद चे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी बंधू वैभव शिंदे विशाल शिंदे
डाॅक्टर दिपाली शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले
यशदा संस्थेचीही त्याला अमुल्य साथ मिळाली 
तो विठ्ठलराव शिंदे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन भाऊराव शिंदे यांचा मुलगा आहे 
या यशाबद्दल माढयाचेआमदार बबनदादा शिंदे करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे  धनश्री उद्योग समुहाचे संस्थापक रमेश मालक शिंदे सोलापूर जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे सभापती विक्रमदादाशिदे माढा वेल्फेअर फौंडेशनचे संस्था पक धनराज शिंदे विठ्ठल शुगर चे कार्यकारी संचालक तथा निमगाव चे सरपंच यशवंत शिंदे यांनी अभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा