Breaking

सोमवार, २९ जानेवारी, २०२४

प्रजासत्ताक दिनानिमित्त आझाद युवा फाउंडेशनच्या वतीने वस्तू भेट.



प्रजासत्ताक दिनानिमित्त आझाद युवा फाउंडेशनच्या वतीने वस्तू भेट.
टेंभुर्णी प्रतिनिधी: प्रजासत्ताक दिनानिमित्त टेंभुर्णी येथील आझाद युवा फाऊंडेशन च्या वतीने शाळेत लागणार्या गरजेच्या वस्तूं भेट देण्यात आल्या.
यामध्ये टेंभुर्णी येथील जिल्हा परिषद शाळा नंबर-१ आणि मुलींची शाळा येथे आझाद युवा फाउंडेशन च्या वतीने ब्लूटूथ स्पीकर व सहा नीलकमलच्या खुर्च्या आणि एक टेबल अशा गरजेच्या वस्तू भेट देण्यात आल्या.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक पांडगळे म्हणाले आझाद युवा फाऊंडेशनचे काम अतिशय छान आहे. आझाद युवा फाऊंडेशन शैक्षणिक तसेच गरजवंत विद्यार्थ्यांना मदत करण्यात जास्त भर देत आहेत याचा मला फार अभिमान वाटतोय असेच काम करत रहा तसेच सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या मानसन्मान केला.
यावेळी आझाद युवा फाऊंडेशन चे अध्यक्ष अजीज शेख म्हणाले आम्ही आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेतील लागणार्या गरजेच्या वस्तू तसेच गोरगरिब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत राहणार आहे आपल्या देशाचे म्हणजे हे विद्यार्थी आहेत आणि देशासाठी आझाद युवा फाऊंडेशन खारीचा वाटा म्हणून आम्ही यापुढेही असेच काम करु यावेळी फाउंडेशन चे समीर जहागिरदार,आली मुजावर, इमरान बागवान,आसिफ शेख उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत शिंदे सर म्हणाले या ब्लूटूथ स्पीकर च्या साह्याने आमच्या शाळेतील आम्ही अभ्यासात मदत करुन घेऊ तसेच आझाद युवा फाऊंडेशन चे कौतुक केले यावेळी मुख्याध्यापक अरुण पांडगळे, मुख्याध्यापक सुनंदा तळेकर,चोबे मॅडम,बदर मॅडम, तळेकर मॅडम, क्षिरसागर मॅडम आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा