Breaking

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

*विठ्ठलराव शिंदे कारखान्यास राज्य पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमता व उत्कृष्ठ विकास पुरस्कार जाहीर*



*विठ्ठलराव शिंदे कारखान्यास राज्य पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमता व उत्कृष्ठ विकास पुरस्कार जाहीर*


टेंभुर्णी/प्रतिनिधी 

*मध्य विभागात विजय लोकरे रा.उजनी(मा) व सुरेश आवारे रा.पिंपळनेर यांना प्रथम क्रमांकाचा ऊस भूषण पुरस्कार जाहीर*

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट,पुणे या संस्थेकडून सन 2022-23 चा मध्य विभागातील तृतीय क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता व प्रथम क्रमाकांचा उत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन पुरस्कार जाहीर झालेला आहे. तसेच कारखान्याचे सभासद विजय लोकरे रा.उजनी(मा) व सुरेश आवारे रा.पिंपळनेर यांना मध्य विभागातील सन 2022-23 चा प्रथम क्रमाकांचा ऊस भूषण पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

अधिक माहीती देताना आ.शिंदे यांनी सांगितले की,सन 2022-23 गळीत हंगामामध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने युनिट नं.1 पिंपळनेर येथे 18 लाख 41 हजार 420 मे.टन ऊस गाळप करून 11.33 टक्के साखर उता-याने 16 लाख 52 हजार 800 क्विंटल साखरेचे उत्पादन केलेले आहे. या हंगामामध्ये गाळपक्षमतेच्या वापरामध्ये 6.97 टक्केने वाढ झाली असून गाळपक्षमता वापर 103.93 टक्के आहे.या व इतर तांत्रिक बाबींचा विचार करून युनिट नं.1 पिंपळनेर या कारखान्याची तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तसेच कारखान्यामार्फत कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन व साखर उतारा वाढीसाठी राबविलेल्या स्वंतत्र ऊस विभाग,त्रिस्तरीय बेणेमळा, व्हीएसआय निर्मित कृषी निविष्ठांचा वापर,ठिबक सिंचन,माती परिक्षण, ॲपद्वारे मोजणी व नोंदणी यासह इतर विविध ऊस विकास योजना या बाबींचा विचार करून मध्य विभागातील प्रथम क्रमाकांचा उत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्काराचे वितरण गुरुवार दि.11/01/2024 रोजी सकाळी 10.30 वा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट,पुणे या संस्थेच्या सन 2022-23 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंत्रीमहोदय व प्रमुख मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात येणार आहे.
तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट,पुणे या संस्थेकडून विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे सभासद विजय शिवलाल लोकरे रा.उजनी(मा) यांनी मध्य विभागात पूर्व हंगामात कोएम 0265 या ऊसाचे हेक्टरी 314.58 इतके ऊस उत्पादन घेतल्याने त्यांची ऊस भूषण पुरस्कारासाठी प्रथम क्रमाकांने निवड झाली आहे. सुरेश जालिंदर आवारे रा.पिंपळनेर यांनी मध्य विभागात खोडवा हंगामात कोएम 0265 या ऊसाचे हेक्टरी 239.52 इतके ऊस उत्पादन घेतल्याने त्यांची ऊस भूषण पुरस्कारासाठी प्रथम क्रमाकांने निवड झाली आहे.
यापूर्वी कारखान्यास चाचणी गळीत हंगामामध्ये विक्रमी ऊस गाळप, उत्तम आर्थिक व्यवस्थापन, उच्चांकी साखर निर्यात, उच्चांकी ऊस गळीताबद्दल देश व राज्यपातळीवरील 24 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कारखान्यास जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सभासद, ऊस पुरवठादार,ऊस तोडणी वाहतुक कंत्राटदार, मजूर, व्यापारी, कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

चौकट-
आ.बबनराव शिंदे, संस्थापक चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने अल्पावधीत देशात व राज्यात नावलौकीक प्राप्त करून सातत्याने सभासद, ऊस पुरवठादार शेतक-यांचे हित जोपासलेले आहे. कारखान्यास तांत्रिक व ऊस विकास पुरस्कार प्राप्त झाल्याने कारखान्याचे नावलौकीकात आणखी एक मानाचा तुरा गोवला गेला आहे- वामनराव उबाळे-व्हाईस चेअरमन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा