विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षितता सप्ताह साजरा
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर 53 व्या राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षितता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिवर्षी ४ ते ११ मार्च हा कालावधी राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह म्हणुन साजरा करण्यात येत आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर 53 व्या राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीस कारखान्याचे जेष्ठ कामगार वर्कशॉप फोरमन जगन्नाथ वाघमोडे यांच्या व सर्व खातेप्रमुख यांच्या शुभहस्ते मा.कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
वर्क्स मॅनेंजर अविनाश ढेकाणे यांनी उपस्थित कर्मचा-यांना सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन करून कर्मचा-यांना राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षेचे महत्व व संकल्पना याबाबत सविस्तर माहीती दिली. त्यानंतर सेफ्टी ऑफिसर महेश देशमुख व सुरक्षा अधिकारी दिगंबर जगताप यांनी कारखान्यातील कामगारांना सुरक्षिततेची शपथ दिली.
सदर प्रसंगी कारखान्याचे वर्क्स मॅनेजर अविनाश ढेकाणे, जनरल मॅनेजर प्रोसेस पोपट येलपले, चिफ इंजिनिअर संजय कैचे, डिस्टीलरी मॅनेजर पांडूरंग बागल, चिफ केमिस्ट अनिल जगताप, डेप्युटी चिफ अकौंटट दत्ताजीराव देसाई,हेड टाईम किपर रफिक आतार,सिव्हील इंजिनिअर सुनिल शिंदे, असि.परचेस ऑफिसर सचिन चौगुले व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा