Breaking

गुरुवार, ७ मार्च, २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार ) गटाच्या संपर्कप्रमुख पदी शशिकांत सोनटक्के यांची निवड*



*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार ) गटाच्या संपर्कप्रमुख पदी शशिकांत सोनटक्के यांची निवड*


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या इंदापूर तालुका संपर्कप्रमुख पदी शशिकांत राजेंद्र सोनटक्के यांची निवड

 केली आहे आज सकाळी इंदापूर येथील
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार* पक्ष कार्यालय इंदापूर येथे  खासदार सौ.सुप्रियाताई सुळे* व सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सागरबाबा मिसाळ, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अमोलजी मुळे,इंदापूर तालुका अध्यक्ष ॲड.तेजसिंहजी पाटिल,इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्रजी पाटील, इंदापूर तालुका उपाध्यक्ष सुनिलजी खाडे  भारत सोनटक्के व इंदापूर तालुका ओबीसी सेल न्विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब चितळकर यांच्या उपस्थितीत शशिकांत राजेंद्र सोनटक्के यांना *इंदापूर संपर्कप्रमुख* पदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले 
यावेळी सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की देशाचे नेते आदरणीय पद्मभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांनी दाखवलेल्या शाहू-फुले-आंबेडकर या मार्गावर चालत असताना साहेबांचे विचार,पक्षाची ध्येयधोरणे विकासकामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कटीबद्ध राहण्याचे आव्हान  यावेळी  केले असून यापुढे पक्ष वाढवण्यासाठी सर्व तरुणांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले कुठल्याही अडचणी आल्या तर डायरेक्ट मला संपर्क करा मी तुमच्या सेवेसाठी अहोरात्र आहे असे आव्हान तरुणायला सुळे यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा