ब्रह्माकुमारी संस्थेत शिवरात्र व महिला दिन उत्साहात
साजरा....
बेंबळे/ प्रतिनिधी. फोटो
टेंभुर्णी येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी उपसेवा केंद्रामध्ये महाशिवरात्र व महिला दिन विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. माढा तालुका शिवसेनेचे (शिंदे गट) सामाजिक कार्यकर्ते संजय बाबा कोकाटे यांच्या सुविद्य पत्नी सौ सविता कोकाटे साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब करनवर पिंपळनेरच्या सरपंच अनुजा डांगे सामाजिक कार्यकर्त्या ज्योती कोठारी प्राचार्या जयश्री वाकसे राजयोगिनी बि.के. गोदावरी बहन, अश्विनी बहन, अनिता बहन ,सायली बहन, डॉक्टर पावले सौ हेमलता पावले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी अनिता बहनजी यांनी महाशिवरात्रीचे व महिला दिनाचे महत्त्व सांगून सर्वांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या, यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिव ध्वजारोहण करण्यात आले व दीप प्रज्वलन करण्यात आले. राजयोगिनी गोदावरी बहन यांनी संस्थेचा परिचय देऊन महाशिवरात्रीचे अध्यात्मिक रहस्य विशद केले व महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यानंतर संजय बाबा कोकाटे म्हणाले की सध्याच्या धकाधकीच्या व अस्थिर वातावरणात भक्ती, ज्ञान, योग याविषयी अध्यात्मिक ज्ञान प्रत्येकाने आत्मसात करणे काळाची गरज निर्माण झाली आहे. याप्रसंगी नानासाहेब करणवर ,सरपंच सुजाता डांगे, ज्योती कोठारी यांनीही आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या, टेंभुर्णी सेवा केंद्राच्या संचालिका अनिता बहनजी यांना पिंपळनेरच्या सरपंच अनुजा डांगे यांचे हस्ते यावेळी मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
सूत्र संचालन अश्विनी बहनजी व हेमलता पावले यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सायली बहनजी आणि पूजा बहनजी यांनी विशेष परिश्रम घेतले .या कार्यक्रमास टेंभुर्णी, बेंबळे, शिराळ, पिंपळनेर, कुर्डूवाडी ,जेऊर ,शेवरे, भीमानगर या ठिकाणचे महिला स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा