विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे हंगाम अखेर ऊस बिल अदा
हंगामअखेर ऊस बिल अदा करणारा राज्यातील एकमेव कारखाना
कामगारांना एक महिन्याचा बक्षिस पगार अदा.... आ.बबनराव शिंदे
बेंबळे प्रतिनिधी.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने ऊस गाळप हंगाम 2023-24 मध्ये युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथे यशस्वी गाळप करून या हंगामात दोन्ही युनिट कडे हंगामअखेर पर्यंत गाळपास आलेल्या ऊसास अनुदानासह संपूर्ण ऊस बिलाचे पेमेंट व ऊस तोडणी वाहतूक बिल वेळेत अदा केलेली असून हंगाम अखेर ऊस बिल अदा करणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना राज्यातील एकमेव कारखाना ठरला असल्याची माहीती संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याचे सन 2023-24 गळीत हंगामाची सांगता झालेली असून कारखान्याने दोन्ही कारखान्याचे कार्यक्षेत्रातील माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी यांचे संपूर्ण ऊसाचे गाळप केलेले आहे. सन 2023-24 गळीत हंगामामध्ये युनिट नं.1 कडे 18 लाख 92 हजार 949 मे.टन ऊसाचे गाळप होवून 11 टक्के साखर उता-याने 19 लाख 28 हजार 850 क्विंटल साखर पोती उत्पादीत झाली आहेत. तसेच युनिट नं.2 कडे 6 लाख 25 हजार 888 मे.टन ऊसाचे गाळप होवून 11.14 टक्के साखर उता-याने 6 लाख 63 हजार 900 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे. दोन्ही युनिट चे मिळून 25 लाख 18 हजार 837 मे.टन गाळप होवून 25 लाख 92 हजार 750 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे. दोन्ही युनिटचे मिळून 10 कोटी 41 लाख 81 हजार 195 युनिट वीज विक्री करण्यात आलेली आहे. या हंगामामध्ये युनिट नं.1 चे डिस्टीलरी विभागाकडे शुगर सिरप पासून 95 लाख 84 हजार 076 ब.लि., बी हेवी 1 कोटी 25 लाख 93 हजार 251 ब.लि. व सी हेवी 84 लाख 02 हजार 740 ब.लि. इथेनॉल उत्पादन असे एकूण 3 कोटी 05 लाख 79 हजार 967 ब.लि.इथेनॉल उत्पादन झालेले आहे. तसेच उत्पादीत इथेनॉल ऑईल कंपन्यांना सी हेवी-68 लाख 06 हजार, बी हेवी-42 लाख 93 हजार व शुगर सिरप-95 लाख 82 हजार असे एकूण एकूण 2 कोटी 06 लाख 81 हजार पुरवठा करण्यात आलेले आहे.
या हंगामात दोन्ही युनिट कडे गाळपास आलेल्या ऊसास हंगामाचे सुरूवातीपासून प्रत्येकी 10 दिवसाला ऊस बिलाचे पेमेंट अदा केलेले आहे. या हंगामात गाळपास आलेल्या ऊसास पहिला ॲडव्हान्स प्रति मे.टन रू.2700/- प्रमाणे अदा करण्यात आला असून या हंगामात 16 ते 31 जानेवारी प्रति टन रू.50/- 1 ते 28 फेब्रुवारी प्रति टन रू.100/- व 1 मार्च,2024 पासून हंगाम अखेर पर्यंत प्रति टन रू.150/- याप्रमाणे उत्तेजनार्थ अनुदान अदा करणेत आलेले आहे. या हंगामात हंगाम अखेर अनुदानासाठी एकूण 14 कोटी रूपये अतिरिक्त अदा करणेत आलेले आहे. कारखान्याने या हंगामात ऊस बिलापोटी रू.693 कोटी 86 लाख व 31 मार्च अखेर ऊस तोडणी वाहतूक बिलासाठी रू.170 कोटी 43 लाख अदा करण्यात आले आहेत. या कारखान्याने सातत्याने सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांचे हित जोपासलेले आहे. दोन्ही युनिट कडील यशस्वी कामकाजासाठी कारखान्यात काम करणा-या अधिकारी व कर्मचारी यांना एक महिन्याचे पगाराइतकी रक्कम बक्षिस म्हणून अदा करण्यात आली आहे. त्यापोटी कारखान्याने 3 कोटी 30 लाख अदा केले आहेत.
सन 2023-24 हंगामात युनिट नं.1 व युनिट नं.2 कडे गाळप झालेल्या ऊसास 10 दिवसाला पेमेंट देणारा, हंगामअखेर ऊस बिलाचे संपूर्ण पेमेंट करणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना राज्यातील एकमेव कारखाना असल्याचे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव भाडे मॅनेजिंग डायरेक्टर संतोष दिग्रजे जनरल मॅनेजर सुहास यादव संचालक व विभागीय अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा