*फूटजवळगाव सोसायटी चेअरमनपदी एकनाथ हांडे यांची बिनविरोध निवड*
टेंभुर्णी प्रतिनिधी:-
टेंभुर्णी : -माढा तालुक्यातील फुटजवळगांव विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी एकनाथ दत्तात्रय हांडे तर व्हाईस चेअरमनपदी रणजित खोचरे-पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ठरल्याप्रमाणे माजी चेअरमन कलावती नवले यांनी व व्हा.चेअरमन नवनाथ हांडे यांनी पदाचा राजीनामा दिला होता.या सोसायटीवर लेबर फेडरेशनचे माजी अध्यक्ष भारत पाटील यांच्या पॅनलचे बहुमत आहे.यावेळी तज्ञ संचालक म्हणून विठ्ठल नवले,रेवण पाटील व विठ्ठल हांडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी अकोले खुर्दचे माजी सरपंच विक्रम पाटील,दादासाहेब बनसोडे, सोसायटीचे संचालक शशिकांत पाटील,मावळत्या चेअरमन कलावती नवले,नवनाथ हांडे,संचालक दीपक शंकर,गणेश हांडे,हरिदास हांडे,बंकट महानवर गुरुजी,जगन्नाथ नवले,रामराव महानवर,किशोर नवले,गणेश हांडे,बापूसाहेब पवार,उपसरपंच विठ्ठल हांडे, डॉ.बिभीषण जाधव,डॉ.रतिलाल नवले,संजय खोचरे-पाटील,विजय महानवर,जैनुद्दीन मुलाणी,नागनाथ हांडे,विठ्ठल दरगुडे,नागनाथ गोरड, नागनाथ हांडे आदीजन उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.एस.कोळी,पी.आर.बागल व अशोक भोसले यांनी काम पाहिले.
या निवडीबद्दल लेबर फेडरेशनचे माजी अध्यक्ष भारत पाटील यांनी चेअरमन,व्हाईस चेअरमन व संचालक यांचा सन्मान केला.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीबद्द्ल आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,धैर्यधील मोहिते-पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा