*नाना भैया युवा मंचच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन*
*टेंभुर्णी हे सर्वधर्म समभाव प्रतीक असणारे शहर- रावसाहेब नाना देशमुख*
टेंभुर्णी प्रतिनिधी :-
टेंभुर्णी येथे नाना भैया युवा मंचच्या वतीने मुस्लिम बांधव यांच्यासाठी रोजा इफ्तार पार्टीचे दिनांक 6/4/2024रोजी सायंकाळी देशमुख अँड देशमुख कंपनी कार्यालय सुरली रोड येथे मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिन्यातील पवित्र रोजा उपवासासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी टेंभुर्णी व पंचक्रोशीतील मुस्लिम बांधवांनी लक्षणीय उपस्थिती दर्शवली होती.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब नाना देशमुख यांनी सांगितले की टेंभुर्णी शहरातील सर्व मुस्लिम बांधव हे आपले बंधू असून या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने सर्वधर्मसमभाव असणारी आमची टेंभुर्णी असल्याचे त्यांनी सांगितले. व पवित्र रमजान महिन्याच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व मुस्लिम बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची या निमित्ताने रावसाहेब नाना यांनी गवाही दिली.
टेंभुर्णी हे सुशिक्षित लोकांचे शहर असून या शहरात जाती धर्मापेक्षा माणुसकी जास्त जपली जाते कोणत्याही धर्माकडे जातीकडे न पाहता मानवता, प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा अशा पद्धतीने नागरिक येथे वागत असतात. आपण सर्वजण एकच असून यापुढेही पवित्र रमजान मासानिमित्त इफ्तार पार्टीची परंपरा जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे निमंत्रक सुरज भैय्या देशमुख यांनी सांगितले.
नाना भैया युवा मंचच्या वतीने दरवर्षी अतिशय नियोजनबद्ध अशा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते ही इतर इफ्तार पार्टी म्हणजे आमच्या घरातीलच एक कार्यक्रम असल्यासारखे वाटते त्यांच्याकडून मिळणारा जिव्हाळा प्रेम आपुलकी नेहमीच आपलेपणाची वाटते काल ही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केल्यामुळे आम्हाला रोजा सोडता आला असे मत मुस्लिम समाजातील युवक आझर तांबोळी यांनी व्यक्त केले
या इफ्तार पार्टी निमित्त जामा मस्जिदचे रियाज तांबोळी, मक्का मस्जिदचे रहीम तांबोळी,मदरसा मस्जिदचे रास्तापुरे रावसाहेब,राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे शब्बीर जहागीरदार यांनी यांच्यासह मार्केट कमिटी संचालक दत्तात्रय देवकर,मार्केट कमिटी संचालक राजाभाऊ थोरात,माजी सरपंच बाळासाहेब महाडिक,माजी सरपंच परमेश्वर खरात,माजी सरपंच अनिल जगताप,सुधीर महाडिक,बाबा धोत्रे,सोमनाथ कदम,गोरख बप्पा देशमुख,गणेश केचे,ग्रामपंचायत सदस्य सचिन होदाडे,वैभव महाडिक,शैलेश ओहोळ,अप्पासाहेब हवलदार तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील बांधव उपस्थित होते.
नाना-भैय्या युवा मंचाचे पदाधिकारी अक्षय खरात,प्रमोद भरगंडे,संजय लोंढे,सचिन खुळे,बापूसाहेब शिंदे,नागेश माळी,प्रशांत देशमुख,सुरेश देशमुख,केदार नाळे,शुभम देशमुख,लखन माने,पप्पू देशमुख,बापू ओहोळ,सतीश खुळे,नानासाहेब भोसले,बिटू केचे,आकाश सुतार,अनिल माने,जयवंत देशमुख,रणजित अटकळे,शारंग गायकवाड,गणेश सरवदे,साहिल तांबे,अक्षय कांबळे,सुहास देशमुख,प्रशांत खुळे,रोहित खडके यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
चौकट...
जुना लोकांनी जे सर्वधर्मसमभावाचे संस्कार आमच्यावर रुजवले आहेत त्यामध्ये आम्ही कधीच खंड पडू देणार नाही. त्यांनी दिलेली मानवतेची,आपुलकीची शिकवण आम्ही नवी पिढी या नात्याने सदैव जपू. जात-धर्म यापलीकडे भाऊ-भाऊ म्हणूनच आमचे नाते ओळखले जावे इतके प्रेम आम्ही एकमेकांवर करु. आपली टेंभुर्णी हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक ठरणारी आहे यातूनच गावाचा विकास,प्रगती होणार आहे. इफ्तार पार्टीच्या निमित्ताने सर्वांना भेटून सर्व मुस्लिम बांधवांशी संवाद साधता आला यांचा आनंद आहे-सुरज भैय्या देशमुख,युवा उद्योजक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा