Breaking

रविवार, १४ एप्रिल, २०२४

ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी.


ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी.


टेंभुर्णी प्रतिनिधी/ धनंजय भोसले.

श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टेंभुर्णी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 133 यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पालक प्रतिनिधी गणेश केचे हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष तुकाराम राऊत व शहर ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक संतोष वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष महेंद्र सोनवणे मुकुंद सुतार आदर्श शिक्षक समितीचे नेते संतोष वरकुटे दैनिक लोकमत चे पत्रकार गणेश पोळ स्वराज्य ग्रुप चे अध्यक्ष प्रशांत देशमुख संस्थापक हरिचंद्र गाडेकर प्रिन्सिपल रेखा गाडेकर सचिव अर्चना गाडेकर ज्येष्ठ मार्गदर्शक यशोदा गाडेकर कैलास खरसांडे याचबरोबर शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शाळेचे समन्वयक धनंजय भोसले यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा