*आझाद युवा फाऊंडेशन च्या वतीने सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न...... पोलीस निरीक्षक दीपक पाटील*
टेंभुर्णी प्रतिनिधी: टेंभुर्णी येथील आझाद युवा फाऊंडेशन च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त सरबत वाटप करण्यात आले तसेच आझाद युवा फाऊंडेशन च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी टेंभुर्णी पोलीस स्टेशन चे पी.आय.दिपक पाटील यांनी आझाद युवा फाऊंडेशन ने सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे विविध उपक्रम समाज हिताचे असल्याचे यावेळी सांगितले तसेच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सरबत वाटपाचा उपक्रम खुप छान राबवला आहे असे म्हणाले यावेळी त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरबतचा आस्वाद घेतला आणि आझाद युवा फाऊंडेशन चे कौतुक ही केले.
यावेळी आझाद युवा फाऊंडेशन चे अध्यक्ष अजीज शेख बोलताना आपल्या टेंभुर्णी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ही असाच सरबत वाटपाचा उपक्रम राबवला होता आपण सर्वांनी महापुरुषांच्या जयंती निमित्त असेच सामाजिक एकोपा, सलोखा राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
यावेळी टेंभुर्णी पोलीस स्टेशन चे पी.आय.दिपक पाटील , सहायक पो.हे विलास रणदिवे, भाजपचे माळ तालुका अध्यक्ष योगेश बाबाराजे बोबडे,माजी सरपंच प्रमोद कुटे, तिसऱ्या आघाडीचे युवा नेते सुरज देशमुख, आरपीआयचे परमेश्वर खरात, जयवंत पोळ, ॲड.संतोष कानाडे, टेंभुर्णी ग्रामपंचायतचे सदस्य नागनाथ वाघे, गौतम कांबळे, उद्योगपती आय्युबभाई पटेल,परमेश्वर खरात, आझाद युवा फाऊंडेशन चे उपाध्यक्ष शहाजमान जहागिरदार, समीर जहागिरदार, आमिर काझी, इम्तियाज सय्यद, डॉ.शहाजहान काझी, फारुख देशमुख, आसिफ शेख,अली मुजावर,रब्बेसलाम शेख, जावेद जहागिरदार, रफिक शेख आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा