पिलीव येथील जि परिषद प्राथमिक शाळेच्या महादेवी पाटील यांना आदर्श शिक्षीका पुरस्कार प्रदान
पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस - माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जि परिषद प्राथमिक शाळेच्या उपशिक्षीका महादेवी पाटील यांना माळशिरस पंचायत समीतीच्या वतीने देणयात येणारा तालुका स्तरीय आदर्श शिक्षीका पुरस्कार प्राथमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी कादर शेख,माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे, गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार करडे ,किरण मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महादेवी पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महादेवी पाटील यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रप्रमुख आनंद कचरे,सहहयाक केंद्रप्रमुख राजकुमार फासे, मुख्याध्यापक पवार ,शाळा व्यवस्थापन समिती ,शिक्षक ,ग्रामस्थ यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्याकडुन अभिनंदन व कौतुक होत आहे. फोटो - शिक्षीका महादेवी पाटील यांना आदर्श शिक्षीका पुरस्कार प्रदान करताना जिल्हा शिक्षणाधिकारी कादर शेख,गटविकास अधिकारी विनायक गुळवे, गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार करडे व इतर मान्यवर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा