महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी चे दोन विद्यार्थी 100% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम.....
टेंभुर्णी प्रतिनिधी:-
टेंभुर्णी येथील महात्मा फुले विद्यालयाचे विद्यार्थी प्रथमेश दत्तात्रय गवळी व संस्कार बबन काळे 100% गुण घेऊन एस.एस.सी परीक्षेत महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम आले आहेत. माधुरी प्रदीप नवले ही विद्यार्थिनी 98.80% गुण घेऊन टेंभुर्णी केंद्रात द्वितीय व सुप्रिया सोमनाथ अटकळे आणि श्रावणी संतोष थोरात या दोन विद्यार्थिनी 98.60% गुण घेऊन टेंभुर्णी केंद्रात तृतीय आले आहेत. तसेच विद्यालयाचे 28 विद्यार्थी 95% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेले असून, याच विद्यालयाचे 67 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा निकाल100% लागलेला आहे. विद्यालयातील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे; श्रेयश गजानन माळी 98.40% गुण, प्रतीक्षा जयदेव कदम 98.20% गुण, समृद्धी अनिल भानवसे 98.20% गुण, प्रतिक शरद पाटील 98.00% गुण, ओंकार औदुंबर भोसले 97.40% गुण, श्रुती विजय गायकवाड 97.40% गुण, अपूर्वा चंद्रकांत बसवंत 97.00% गुण, ओम संतोष यादव 97.40% गुण, दिव्या ज्योतीराम पाटील 97.20% गुण, अस्मिता बाळासाहेब पाटील 97.20% गुण, विघ्नेश विनोद थोरात 97.20% गुण, अर्जुन दीपक कोरे 97.00% गुण, अमर युवराज केचे 97.00% गुण, समीक्षा कैलास देशमुख 96.80% गुण, विक्रांत मधुकर जगताप 96.40% गुण, श्रीराम बाळासाहेब घुमरे 96.00% गुण, श्रुती दत्तात्रय दळवी 96.00% गुण, शंभूराजे अनिल लोकरे 95.80% गुण, तेजस अनिल कांबळे 95.60% गुण, शंभूराजे बापू सलगर 95.60% गुण, आरती नवनाथ मुळे 95.40% गुण, शिवानी नागनाथ मस्के 95.00% गुण, विशाखा धीरज चोंदे 95.00% गुण. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन माननीय आमदार श्री.बबनरावजी शिंदे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन श्री रणजितसिंह शिंदे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.नारायण भानवसे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विजय यादव सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.शोएब बागवान सर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा