Breaking

बुधवार, २९ मे, २०२४

बबनरावजी शिंदे माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम


बबनरावजी शिंदे माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम 
कन्हेरगाव (प्रतिनिधी)
       महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे १० वी बोर्ड परीक्षा २०२४ चा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला असून    अकोले (खुर्द) येथील बबनरावजी शिंदे माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाने इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा निकालात  यशाची परंपरा कायम प्रशालेचा निकाल १०० टक्के निकाल लागला आहे.

                यामध्ये १९१ पैकी १९१ उत्तीर्ण झाले असून ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणारे ३९ विद्यार्थी तर ८०% पेक्षा जास्त गुण मिळवणारे ७३ विद्यार्थी तर ७५% पेक्षा जास्त गुण मिळवणारे ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले
            ‌‌प्रशालेतील प्रथम क्रमांक  कु. ढवळे गौरी आनंदराव ९९.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे तर  क्रमांक कु. पाटील तेजश्री तात्यासाहेब ९७.६० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर तृतीय क्रमांक कु.लोकरे अस्मिता महादेव ९७. ४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळावला आहे.
           या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे,संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार संजय मामा शिंदे , तसेच संस्थेचे सचिव तथा प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र ठोंबरे,
प्राचार्य जवानसिंग राजपूत,
मुख्याध्यापक अमोल लोंढे,मुख्याध्यापिका श्रीमती मधुरा सुरवसे यांनी प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे तसेच गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना अध्यापन करणारे मार्गदर्शक शिक्षक यांचे उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा