Breaking

गुरुवार, २३ मे, २०२४

34 टक्के वाढीचा फरक व कमिशन डिपॉझीट रक्कम तोडणी वाहतूकदारांच्या खात्यात जमाफरकासह कमिशन डिपॉझीटची 79 कोटी रक्कम अदा-फरक व कमिशन डिपॉझीट देणारा राज्यातील एकमेव कारखाना-आ.बबनराव शिंदे



34 टक्के वाढीचा फरक व कमिशन डिपॉझीट रक्कम तोडणी वाहतूकदारांच्या खात्यात जमा


फरकासह कमिशन डिपॉझीटची 79 कोटी रक्कम अदा-

फरक व कमिशन डिपॉझीट देणारा राज्यातील एकमेव कारखाना-आ.बबनराव शिंदे


 बेंबळे/प्रतिनिधी मुकुंद रामदासी

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने युनिट नं.1पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील ऊस गाळप हंगाम 2023-24 मधील ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांना 34 टक्के वाढीचा फरक व कमिशन डिपॉझीट सह 79 कोटी रक्कम वाहतूक ठेकेदार/मुकादम यांच्या बँक खात्यात जमा करणेत आली असल्याची माहीती संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की,  विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे सन 2023-24 गळीत हंगामामध्ये युनिट नं.1 कडे 18 लाख 92 हजार 949 मे.टन ऊसाचे गाळप होवून 11 टक्के साखर उता-याने 19 लाख 28 हजार 850 क्विंटल साखर पोती उत्पादीत झाली आहेत. तसेच युनिट नं.2 कडे 6 लाख 25 हजार 888 मे.टन ऊसाचे गाळप होवून 11.14 टक्के साखर उता-याने 6 लाख 63 हजार 900 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे. दोन्ही युनिट चे मिळून 25 लाख 18 हजार 837 मे.टन गाळप होवून 25 लाख 92 हजार 750 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे. या हंगामात दोन्ही युनिट कडे गाळपास आलेल्या ऊसास हंगामाचे सुरूवातीपासून 10 दिवसाला ऊस बिलाचे पेमेंट अदा केलेले आहे. या हंगामात गाळपास आलेल्या ऊसास पहिला ॲडव्हान्स प्रति मे.टन रू.2700/- प्रमाणे अदा करण्यात आला असून या हंगामात 16 ते 31 जानेवारी प्रति टन रू.50/- 1 ते 28 फेब्रुवारी प्रति टन रू.100/- व 1 मार्च,2024 पासून हंगाम अखेर पर्यंत प्रति टन रू.150/- याप्रमाणे उत्तेजनार्थ अनुदान अदा करणेत आलेले आहे. कारखान्याने या हंगामात ऊस बिलापोटी रू.693 कोटी 86 लाख अदा केलेले आहेत.

या हंगामामध्ये दोन्ही युनिट कडे तोडणी वाहतूक करणा-या ट्रक/ट्रॅक्टर,ट्रॅक्टरगाडी व बैलगाडी मुकादम यांना साखरसंघ स्तरावर झालेल्या सामंजस्य करारानुसार तोडणी कमिशनमध्ये 1 टक्का वाढ करून 20 टक्के केलेले आहे. त्यानुसार कारखान्याने नुकताच 34 टक्के वाढीव दरानुसार तोडणी वाहतूक बिले तयार करून वाढीच्या फरकाची एकूण 36.04 कोटी रक्कम ठेकेदारांना अदा केलेली आहे. तसेच कमिशन डिपॉझीट एकूण 42.96 कोटी  अशी एकूण 79 कोटी  रक्कम तोडणी वाहतूक ठेकेदार/मुकादम यांचे बँक खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे. तसेच या हंगामात बिगर ॲड़व्हान्स तोडवाहतूक करणा-या ठेकेदार/मुकादम यांना वाढीव कमिशन ची होणारी 5 कोटी रक्कम येत्या आठ दिवसात अदा करणेत येईल. फरक व कमिशन डिपॉझीट अदा करणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना राज्यातील एकमेव कारखाना ठरला आहे. कारखान्याने ऊस तोडणी वाहतूक बिलापोटी एकूण 215 कोटी 24 लाख अदा केलेले आहेत. ऊस बिल व तोडणी वाहतूक बिलासह एकूण 909 कोटी 10 लाख अदा केलेले आहेत.

पुढील सन 2024-25 गळीत हंगामासाठी दोन्ही युनिटकडे गाळप क्षमतेएवढा ऊस पुरवठा होणेसाठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार सुरू करणेत आले असून ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार व मुकादम यांनी कारखान्याचे शेती विभागाशी संपर्क करून करार करावेत. तसेच ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेस कारखाना धोरणानुसार लवकरच ॲडव्हान्स वाटप करणेची कार्यवाही होणार आहे. तसेच पुढील हंगाम यशस्वीरित्या पार पाडणेसाठी सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांनी जास्तीत जास्त ऊस नोंदी कारखान्याकडे देवून हंगाम यशस्वी करणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन आ.शिंदे यांनी केले.

सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे,कार्यकारी संचालक  व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा