Breaking

शनिवार, ४ मे, २०२४

माढा लोकसभा मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् बनवण्यासाठी रणजीत निंबाळकर यांना विजयी करा...आमदार बबनदादा शिंदे



माढा लोकसभा मतदारसंघ सुजलाम् सुफलाम्  बनवण्यासाठी रणजीत निंबाळकर यांना विजयी करा....... आमदार बबनदादा शिंदे 


बेंबळे.. प्रतिनिधी.                   
           केंद्र सरकारकडून हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात  कृष्णा , नीरा , भीमा व सीना नद्यांचे पाणी सर्वत्र पोहोचून हा मतदार संघ सुजलाम्-सुफलम बनवण्याचा ध्यास घेतलेल्या भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कमळ चिन्ह समोर बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आव्हान आमदार बबनदादा शिंदे यांनी बेंबळे येथील जाहीर प्रचार सभेत बोलताना केले. आमदार शिंदे म्हणाले की खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी कोट्यावधी रुपयाचे रस्ते या भागास दिलेले आहेत यापुढे निरा-भिमा योजना व कृष्णा फ्लड डायव्हर्शन योजना अस्तित्वात आणून त्यांचे पाणी उजनी धरणात आणणे, पावसाळ्यात वाया जाणारे पाणी भीमा सीना नदीवर मोठे बॅरेजेस बांधून आडवणे व लाखो एकर शेतीला पाणी पुरवणे हे आव्हानात्मक काम असून आठ बैरेजेस बांधण्यासाठी 2 हजार 400 कोटी रुपये व इतर अन्य योजना साठी हजारो कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध होण्यासाठी रणजीत सिंह निंबाळकर यांना विजयी करणे आवश्यक आहे, कारण भावी प्रधानमंत्री पुन्हा भाजपचेच नरेंद्र मोदीजी हेच असणार आहेत व म्हणून सात मे रोजी भाजपचे खासदार निंबाळकर यांच्या कमळ चिन्हा पुढील बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे व ते आपण पार पाडावे असे आव्हान आमदार शिंदे यांनी केले. 


      प्रारंभी विष्णू हुंबे यांनी प्रास्ताविक केले , मा. कृषी सभा सभापती संजय पाटील भीमा नगरकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे, माजी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती भारत आबा शिंदे या मान्यवरांनी सद्य वस्तुस्थितीचा ओहापोह करून खासदार रणजीत निंबाळकर यांना मत देणे का आवश्यक आहे हे पटवून दिले देऊन त्यांना विजयी करण्याचे  आव्हान केले.
 चौकट... 
       या सभेत महाळुंग तालुका माळशिरसचे नगराध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की आम्ही माळशिरस तालुक्यात घरोघरी निंबाळकरांचा प्रचार करत आहोत व मी खात्रीपूर्वक विश्वासाने सांगतो की माळशिरस तालुक्यातून 50 टक्के पेक्षा जास्त मतदान कमळ चिन्हावर होणार आहे व निंबाळकर पुन्हा खासदार होणार हे निश्चित.
          याप्रसंगी रत्नाकर कुलकर्णी गंगाधर भोसले पोपट चव्हाण दिलीपराव भोसले राजाभाऊ बागल लक्ष्मण मस्के दादासाहेब देशमुख रामभाऊ कांबळे शिवाजी पाटील रवींद्र श्रीखंडे शांतीभाई शहा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रचार सभेस परिते घोटी हरीनगर मिटकलवाडी वाफेगाव श्रीपुर महाळुंग अकोले बुद्रुक हरी नगर , भोसलेवाडी व बेंबळे आदी ठिकाणचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन पवार व राजेंद्र मुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीपराव भोसले यांनी  केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा