विखेंच्या सभेत पाऊसाने घातला गोंधळ,उडाला फज्या....खासदार विखेंनी मतासाठी पावसात सभा घेतली.
श्रीगोंदा-नितीन रोही. लोकसभेचे उमेदवार सुजय विखे यांच्या सांगता सभेच्या वेळी सभा सुरू होईच्या पाऊस आल्यामुळे सभेचा फज्जा उडालेला पहावयास मिळाला या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे मतदारांना जागृत करण्यासाठी येणार होते. पण पावसाने हजेरी लावल्याने मतदारांनी सभेचा मंडप सोडला. त्यामुळे ऐनवेळी भाजपचे लोकसभेचे उमेदवार सुजय विखे यांनी मतदारांना थांबण्याची विनंती केली. परंतु बरेच मतदार निघून गेले. थोडक्या मतदारांना विखे यांनी पावसात भिजत मतदान करण्याचे हात जोडून जमिनीवर येत आव्हान केलेले पहावयास मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरद पवार गटाचे निलेश लंके हे भाजपचे सुजय विखे यांच्या विरोधात उभे राहणार असल्याची कल्पना विखे यांनी कधीच केलेली नव्हती पण सुजय विखे यांच्याकडे धनशक्ती असून लंके यांच्याकडे जनशक्ती असल्याचे नागरिकांच्या बोलले जात आहे त्यामुळे चौका चौकात लंके यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. यावेळी उपस्थित श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनदादा पाचपुते, राजेंद्र नागवडे, राजेंद्र मस्के,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, संदीप नागवडे,संजय खेतमाळीस यांच्यासह नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा