विठ्ठलराव शिंदे कारखान्यात तज्ञ संचालकांची नियुक्ती
तज्ञ संचालक-हनुमंत घाडगे रा.वरवडे, अशोक मिस्कीन रा.चव्हाणवाडी टे, भरत चंदनकर रा.आलेगांव बु
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यात हनुमंत घाडगे रा.वरवडे, अशोक मिस्कीन रा.चव्हाणवाडी टे व भरत चंदनकर रा.आलेगांव बु यांची तज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक मंडळाची सभा दि.19/06/2024 रोजी सकाळी 11 वा संपन्न झाली. या सभेत हनुमंत तुकाराम घाडगे रा.वरवडे, अशोक विश्वनाथ मिस्कीन रा. चव्हाणवाडी टे व भरत श्रीरंग चंदनकर रा.आलेगांव बु यांची तज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे यांचे शुभहस्ते नुतन तज्ञ संचालक यांना शाल श्रीफळ देवून सन्मान करणेत येवून शुभेच्छा देण्यात आल्या.
आ.बबनराव शिंदे, संस्थापक चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने अल्पावधीत चौफेर प्रगती केलेली असून काखान्याने सातत्याने सभासद, ऊस पुरवठादार शेतक-यांचे हित जोपासलेले आहे. कारखान्याने ऊस गाळप, साखर उत्पादन व उपपदार्थ उत्पादनात उच्चांक प्रस्थापित करून देश व राज्य पातळीवरील पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. अशा वैभवप्राप्त कारखान्यात तज्ञ संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे आमच्यासाठी गौरवाची बाब असल्याचे मत तज्ञ संचालक हनुमंत घाडगे यांनी व्यक्त केले.
सदरप्रसंगी कारखान्याचे उपस्थित सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर व इतर खातेप्रमुख यांनी नुतन तज्ञ संचालक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा