Breaking

शुक्रवार, २१ जून, २०२४

बबनराव शिंदे विद्यालयात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा .


बबनराव शिंदे विद्यालयात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा .

कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे)

 
 २१ जून रोजी अकोले खुर्द ता.माढा येथील बबनरावजी शिंदे माध्य व उच्च माध्य विद्यालयात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .योग दिनानिमित्त  क्रिडाशिक्षक विजय माने , श्रीराम , एस .एस. पाटील  ,कुंभार यांनीही प्रत्यक्षिक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून प्रशालेचा राष्ट्रीय योगा स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त माजी विद्यार्थी याने विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली तसेच प्रशालेतील शिक्षक अनपट  , एस एस पाटील , पवार यांनी योगदिनी विद्यार्थ्यांसमोर वर्काऊट घेऊन सूर्य नमस्कार , योगा डान्स , प्राणायाम शेवटी पसायदानाने समारोप केला.
    यावेळी  प्राचार्य राजेंद्र ठोंबरे  म्हणाले की ,विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून  २१ जून हा दिवस संपूर्ण विश्वभरात योग दिवस म्हणून साजारा केला जातो . निरोगी शरीर . तसेच स्वस्थ मनासाठी योग अतिशय आवश्यक असून दररोज योग केल्यान शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती मिळते . सन २०१५ पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्थरावर साजरा केला जातो तसा प्रत्येक वर्षी आपणही आपल्या प्रशालेत साजरा करत असतो .
२१ जून २०२४ रोजीही आपण १० वा योग दिन साजरा करणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले .
भारतीय संस्कृतीमध्ये योगाला खूप महत्त्व आहे आजच्या धावपळीच्या काळात सर्व विद्यार्थ्यांनी शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी भारतीय संस्कृतीची योग परंपरा जपली पाहिजे असा संदेश विद्यार्थ्यांना योगदिनी दिला .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा