Breaking

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

कुर्डुवाडी शहराच्या पिण्याच्या पाण्याची कंदर ते कुर्डुवाडी नवीन ११६ कोटी रुपयांची योजना अखेरीस अंतीम मंजुरी.... संजय मामा शिंदे *कुर्डुवाडीतील अन्य विकास कामांसाठी सुमारे १५० कोटी रुपयांची मंजुरी....**शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मिळणार चालना....*

*कुर्डुवाडी शहराच्या पिण्याच्या पाण्याची कंदर ते कुर्डुवाडी नवीन ११६ कोटी रुपयांची योजना अखेरीस अंतीम मंजुरी....*
  *कुर्डुवाडीतील अन्य विकास कामांसाठी सुमारे १५० कोटी रुपयांची मंजुरी....*
*शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मिळणार चालना....*


: कुर्डुवाडी, अरुण कोरे (प्रतिनिधी)
    कुर्डुवाडी शहरास कंदर उजनी जलाशयावरुन पाणीपुरवठा होत असून या योजनेचे पाइपलाइन फार जुन्या झाल्याने शहरास नियमित पाणी पुरवठा करण्यास सातत्याने अडथळे येत होते.त्यासाठी शासनाच्या नगोरोत्थान योजनेतून बार्शी टाईप नवीन ११५ कोटी ९९ लाख रुपयांच्या योजनेस अंतिम मंजुरी मिळाली असल्याचे करमाळा मतदार संघाचे आमदार संजय मामा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
     या नवीन योजनेमुळे कुर्डुवाडी शहराच्या परिसरातील तीन गावे व रेल्वेचाही प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असून दोन तीन दिवसात टेंडरही निघणार आहे.
   त्याचबरोबर कुर्डुवाडी शहराचा चेहरामोहरा बदलणारे सर्व रस्त्यांसाठी ६९ कोटी रुपयांची कामेही अंतीम टप्प्यात आली आहेत.
   आजच्या मितीला नवीन शाॅपींग सेंटर, बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण यासाठी सुमारे १५ कोटींच्या कामांनाही अंतिम तरतूद करण्यात आली आहे.
     कुर्डुवाडी शहरातील नवीन पोलिस स्टेशन व ट्रामा केअर सेंटरच्या सुसज्ज नवीन इमारतीही पूर्णार्थाने उभ्या राहिल्या असून अद्ययावत यंत्रे व तज्ज्ञ डॉक्टर्स,स्टाफ उपलब्ध होताच ट्रामा केअर सुरू करण्यात येईल.
      टेंभुर्णी रोडवरील दोन व पंढरपूर रस्त्यावरील एक या रुंदीकरणासह पुलासही अंतीम मंजुरी मिळाली असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.
    कुर्डुवाडी नगरपरिषद वीजबील बचतीसाठी सौर उर्जा, शहरांतर्गत पाइपलाइन, एसटी स्टँड काॅक्रीटीकरण यासाठी नऊ कोटी कोटींच्या कामेही प्रगतीपथावर आहेत.
     माढा रोडवरील सांस्कृतिक भवनासाठी,ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र,पत्रकार कक्षाची तरतूद आदींसाठी सहा कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत.
     गेल्या आमदारकीच्या अल्पावधीतील पहिल्याच कामात कुर्डुवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांच्या कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
   तसेच शहरातील ९१७ मालमत्ता धारकांच्या प्रश्नाचाही पाठपुरावा,सुरू असून रेल्वे गेट नंबर ३८ वरील भुयारी मार्गाचे कामाला रेल्वे बोर्ड वरिष्ठांकडून ब्लाॅक परवानगी मिळताच कामही याच महिन्यात सुरू होणार आहे.
    तसेच सिध्देश्वर नगर, जिजामाता नगर येथील रस्ते,पाइपलाइन व भुयारी गटारी संदर्भात नागरिकांच्या प्रश्नावर प्रश्न केला असता मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांना याच पत्रकार परिषदेत दुरध्वनीद्वारे कामे विनाअडथळा त्वरित पूर्ण करण्याचे आमदार शिंदे यांनी समक्षच सांगितले.
      एकंदरीत कुर्डुवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात मंजुरी मिळून निधी उपलब्ध झाल्याने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चालना मिळणार आहे.या पत्रकार परिषदेला मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय काकडे,सामाजिक कार्यकर्ते बबलू कांबळे,शरद शिंदे,चौधरी आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा