Breaking

मंगळवार, २८ जानेवारी, २०२५

आयडियल एज्युकेशन ट्रस्ट वतीने जीवन गौरव पुरस्कार



आयडियल एज्युकेशन ट्रस्ट वतीने जीवन गौरव पुरस्कार 


टेंभुर्णी प्रतिनिधी/: आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित,सय्यद नगर हडपसर यांच्या वतीने जुलेखा वजीर शेख यांच्या स्मरणार्थ जीवन गौरव पुरस्कार सय्यदनगर येथील जेष्ठ नागरिक इमाम बाबुलाल शेख यांना  जीवन गौरव पुरस्कार २०२५ ने  सन्मानित करण्यात आले.
इमाम बाबुलाल शेख मुळचे माढा तालुक्यातील सापटणे टें गावचे असुन ते पुणे येथे १९७१ सय्यदनगर येथे स्थायिक झाले.
आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित शैक्षणिक संकुल यांनी इमाम शेख यांची सामाजिक कार्य करत असताना आपल्या परिवाराची जबाबदारी या जबाबदारीतून त्यांनी त्यांच्या मुलांना चांगल्या पद्धतीने घडवले आहे त्यांना दोन मुले व तीन मुली असे पाच अपत्य आहेत त्यांचा मोठा मुलगा हजरतअली शेख हे आपल्या वडीलांप्रमाणे समाज कार्यात आहेत याचीच दखल घेत प्रजासत्ताक दिनी जेष्ठ नागरिक इमाम बाबुलाल शेख यांना आयडियल एज्युकेशन ट्रस्ट चे चेअरमन शफीभाई यासीन इनमादार यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेष्ठ नागरिक इमाम बाबुलाल शेख यांचे  सय्यदनगर (पुणे) व त्यांचे मुळ गाव सापटणे(टें) तसेच माढा तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा