Breaking

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

सापटणे (टें) येथील आकाश ढवळे यांची सोलापूर ग्रामीण पाणीपुरवठा मध्ये निवड



सापटणे (टें) येथील आकाश ढवळे  यांची सोलापूर ग्रामीण पाणीपुरवठा मध्ये निवड 

 टेंभुर्णी ( प्रतिनिधी):- सापटणे (टें) तालुका माढा येथील आकाश मदन ढवळे एम.पी.एस.सीच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या सरळ सेवा भरती परीक्षेमधून ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद सोलापर येथे कनिष्ठ अभियंता पदी निवड झाली. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. माढा तालुका हा अधिकाऱ्यांचा गाव म्हणून हळूहळू नावलौकिकास पुन्हा सापटणे टें येत आहे. 

 आकाश ढवळे हे वेणेगाव चे पोलीस पाटील  राजू पाटील यांचे भाचे आहेत. यावेळी आकाश ढवळे म्हणाले की कोणतेही काम कष्ट केल्याशिवाय मिळत नाही असा संदेश आजच्या आकाश तरुण पिढीला म्हणजे सुशिक्षित विद्यार्थ्यांना दिला आहे. आकाश हा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा आहे. आई वडिल शेतकरी आहेत. तो दोन वर्षापासून पुणे येथे अभ्यास करत होता. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करून यश मिळवले. निवड झाल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी त्याचे अभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा