*एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प सोलापूर शहर पश्चिम मधील कुमठे या बिट चा " आरंभ*
टेंभुर्णी प्रतिनिधी
एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प सोलापूर शहर पश्चिम मधील कुमठे या बिट चा " आरंभ*
पालक मेळावा ओंकार मराठी प्राथमिक शाळा , म्हेत्रे वस्ती यज्ञ , कुमठे नाका , सोलापूर येथे पार पडला . सदर मेळाव्यास मा. हरिहरदास गुरव , प्रशालेचे मुख्याद्यापक अध्यक्ष म्हणून लाभले .तसेच श्री प्रशांत शिर्के,बाल विकास प्रकल्प अधिकारी , नागरी प्रकल्प कोल्हापूर व मा. श्री दीपक ढेपे बाल विकास प्रकल्प अधिकारी शहर पश्चिम सोलापूर व श्री नितीन थोरात , जिल्हा समन्वयक इ आकार - सोलापूर,प्रशालेतील सर्व सहशिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पालक मेळावा पार पडला. या पालक मेळाव्याचे आयोजन बिट च्या मुख्यसेविका श्रीम . रोहिणी निर्मळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले .
आरंभ - सुरुवातीचे क्षण मोलाचे' ही संकल्पना बालकांच्या सुरुवातीच्या काळातील महत्त्वाच्या गोष्टींवर भर देते. या संकल्पनेतून पालकांना संवेदनशील पालक बनण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. 'आरंभ - सुरुवातीचे क्षण मोलाचे' या संकल्पनेतील काही महत्त्वाच्या गोष्टी:० ते ३ वर्ष वयोगटातील बालकांच्या संगोपनासाठी कुटुंब आणि समाजाला सक्षम करणे. बालकांच्या वाढ आणि विकासासाठी संवेदनशील पालकत्व, प्रतिसादात्मक कुटुंबाचा सहभाग, खेळ, संवाद, कृती या माध्यमांचा वापर करणे. बालकांना सुरक्षित वातावरण, आहार, आरोग्य आणि स्वच्छता देणे. बालकांना वेगवेगळ्या कृती करून त्यातील मज्जा अनुभवणे खूप आवडते, त्याच उत्सुकतेपोटी बालक त्या गोष्टी करून बघण्याचा प्रयत्न करते. अशावेळी पालकांनी बालकाच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेऊन तशा कृती करण्यास प्रोत्साहन द्यावे.
मेळाव्यास भागातील पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद 203पालकांनी नोंदवला . अंगणवाडी सेविकांनी ० ते ३ वर्षे वयोगटातील बालकांसाठी व बालकांच्या विकासासाठी आवश्यक असणारे वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले , व स्टॉलच्या माध्यमातून उपस्थित बालकांना माहिती देण्यात आली . तसेच तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी रॉकेट लर्निंग च्या माध्यमातून स्टॉल लावण्यात आला. या स्टॉल द्वारे पालकांना व्हाट्सअप ग्रुप व घरचा अभ्यास याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, व व्हाट्सअप ग्रुपला येणार अभ्यास मुलांकडून कसा करून घ्यावा याबाबत पालकांसोबत चर्चा केली , व मार्गदर्शन करण्यात आले.आहार व आरोग्याची सापशिडी खेळ,मेंदुचे जाळे,संपवुया आहाराचे लाॅकडाऊन हे विशेष खेळाचे माध्यमातून संवाद व संदेश देण्याचे खेळ सुपरवायझर निर्मळे मॅडम अंगणवाडीसेविका पुष्पा बळप,नादानबी शेख,प्रतिमा गुंगे,सोनिया बनसोडे यांनी पालकांना खेळ व संवाद मार्फत माहिती देण्यात आली.सर्व स्टाॅल वर पालक व बालक यांनी भेट देवुन खेळ व संवाद विकास कसा होतो याचे अनुभव प्रत्यक्षात घेतले.
यावेळी ओकांर मराठी प्राथमिक शाळा मधील सर्व शिक्षक वृंदानी मेळाव्यामध्ये सक्रीय सहभाग घेतला.
प्रकल्पातील मुख्यसेविका श्रीम .कुलकर्णी मॅडम, श्रीम.ढेपेमॅडम ,विद्यार्थी,
पालकही कार्यक्रमास उपस्थित राहिले.
आरंभ पालक मेळावा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.गायकवाड सहशिक्षिका यांनी केले.
भारती गुरव,प्रमिला शिंगे,शिंदे,कुलकर्णी,सौ
पुजा गुरव ,स्नेहा बनसोडे यांनी व बिट मधील सर्व सेविका मदतनीस यांनी अधिक परिश्रम घेतले.
ई आकार बाल शिक्षण व टी.एच.आर पासुन विविध पदार्थ बनवुन आणलले पालक यांचे सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .आभार सौ.पुजा गुरव यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा