Breaking

रविवार, ६ एप्रिल, २०२५

करमाळा शहर तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सकल मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आले निवेदन



करमाळा शहर तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सकल मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आले निवेदन 


*करमाळा प्रतिनिधी 
करमाळा अल्पसंख्याक समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी  शहर व तालुक्यातील विविध प्रश्नाकडे लक्ष देऊन सोडविण्यासाठी ग्रामविकास व पालक मंत्री सोलापूर मा श्री जयकुमार गोरे साहेब यांना निवेदन दिले - जमीर सय्यद अध्यक्ष सकल मुस्लीम समाज करमाळा व सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक आघाडी कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट* 

*करमाळा विधानसभा मतदारसंघाती अल्पसंख्याक समाजातील शहर व ग्रामीण भागातील विविध प्रश्नाकडे लक्ष वेधून ते सोडविण्यासाठी विविध कामांना निधी उपलब्ध करून अल्पसंख्याक समाजातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्न सोडविण्यासाठी सोलापूर जिल्हा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली व प्रलंबित कामांची यादी देऊन या वर्षीच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून  निधी देण्यात यावे अशी मागणी* *भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी मा. नामदार जयकुमार गोरे साहेब यांनी सांगितले की मी अल्पसंख्याक समाजातील शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध प्रश्नाकडे लक्ष देऊन ते प्रामुख्याने सोडविणार आहे* *ग्रामीण भागातील ज्या गावात कब्रस्तानात दफनभूमीसाठी जागा उपलब्ध नाही अशा गावांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. तसेच कब्रस्तान करिता ऑल कंपाऊंड व इतर भौतिक सुविधा, सुशोभीकरण करण्यासाठी निधी देणार आहे, हजरत चाॅंद वली पाशा दर्गा आवाटी शरीफ यांना अ वर्ग दर्जा या प्रयत्न करणार आहे व भक्त निवास आणि इतर सुविधासाठी निधी देणार आहे. करमाळा शहरातील ईदगाह मैदान  सुशोभीकरण करण्यासाठी, कै नामदेवराव जगताप उर्दू शाळा सुसज्ज अशी शालेय इमारती करिता, मदरसा फैजुल कुराण नालबंद नगर या मदरसा मधील विद्यार्थ्यांन करिता वसतिगृह, मुस्लीम समाज करिता सांस्कृतिक भवन शादी खाना, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सी व पोलीस भरती करिता* *अभ्यासिका, करमाळा उप जिल्हा रुग्णालयात 20 बेडचे डायलिसिस सेंटर सुविधा उपलब्ध करणे, असे अनेक प्रश्न अल्पसंख्याक विभाग आणि ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने सोडविण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. यावेळी  जमीर सय्यद, सचिन भाऊ काळे, समीर शेख, रमजान बेग , सुरज शेख, इकबाल शेख इम्तियाज पठाण, मुस्तकीम पठाण, जहाँगीर बेग, सोयल पठाण  उपस्थित होते.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा