गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीच्या माध्यमातून बावधन व बाेपर्डी ग्रामपंचायतीस घंटागाडी प्रदान.
पांचगणी :
बावधन ग्रामपंचायत व बाेपर्डी ग्रामपंचायतीस गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीच्या माध्यमातून कचरा संकलन घंटागाडी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी, व्हाईस प्रेसिडेंट अभिजीत जोशी, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट विघ्नेश कुमार, जनरल मॅनेजर युवराज थाेरात, सरपंच साै. वंदना कांबळे, उपसरपंच उदयसिंह पिसाळ, ग्रामविकास अधिकारी रामचंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
यावेळी विवेक कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या सामाजिक बांधिलकीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, "बावधन, बाेपर्डी तसेच तालुक्यातील सर्व गावांबराेबर गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनी यांचे बरेच वर्षांपासून अतूट आणि गोड नाते आहे. सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत गरवारे कंपनीकडून ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता यांसारख्या विविध क्षेत्रांत कार्य केले जात आहे. यामध्ये शाळांमध्ये वाॅटर आर आे प्लांट, डिजीटल क्लासरूम, मुलींसाठी सायकली, वेंडीग मशीन देण्यात आल्या आहेत. तसेच वाई नगर परिषदेस अग्निशमन वाहन, वाई बस स्थानकास महाबळेश्वरच्या प्रवाशांसाठी पिकअप शेड, दरवर्षी गरवारे हाप मॅरेथॉनचे प्रायाेजन, भगवा कट्टा प्रतिष्ठानला अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्यात आलेली आहे. तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या गरवारे युवा विकसन केंद्रच्या मार्फत तरूण तरूणींना विविध व्यावसायीक काेर्सेसचे माेफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी नाेकरी व स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासही सहकार्य केले जाते. गेल्या दाेन वर्षात ५०० हून अधिक युवक व युवती यांनी याचा लाभ घेतला आहे. तसेच यातील १०० पेक्षा अधीक गरजुंनी आपला व्यवसाय तसेच नाेकरीच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत. यामध्ये महिलांसाठी फॅशन डिझाइनींग, ब्युटिपार्लर, तसेच सीएनसी मशीम आॅपरेटर, इलेक्ट्रिशीयन, डिजीटल लिट्रेसी, शेळी पालन असे अनेक काेर्सेस सुरु असून गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन यावेळी कुलकर्णी यांनी केले.
ते पुढे म्हणाले, आज ग्रामपंचायतीस घंटागाडी भेट देताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे गावाची स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल आणि ग्रामस्थांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळेल. गावकऱ्यांनी या सुविधेचा योग्य वापर करून गाव स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे. भविष्यातही गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनी अशा समाजोपयोगी उपक्रमांत सहभागी होत राहील. स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आणखी प्रभावी उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे.
प्रारंभी गरवारे कंपनीच्या अधिकार्यांची बैल गाडीमधून मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी दिलीप पिसाळ व उदयसिंह पिसाळ यांनी भाषणामध्ये गरवारे कंपनीच्या उपक्रमाबद्दल काैतुक केले.
यावेळी विवेक कुलकर्णी यांच्याहस्ते घंटा गाडीची चावी सरपंच साै. कांबळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
यावेळी उपसरपंच उदयसिंह पिसाळ यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचलन केले. साै. अरूणादेवी पिसाळ, मदन भाेसले, दिलीपबाबा पिसाळ, विवेक भाेसले, दिपक ननावरे, तानाजी कचरे, दिगंबर रासकर यांनी स्वागत केले. ग्रामसेवक रामचंद्र चव्हाण यांनी आभात मानले. कार्यक्रमास चंद्रकात भाेसले, संदिप पिसाळ, विक्रम पिसाळ, प्रणित पिसाळ, राजेंद्र कदम, अंकुश कुंभार, कांतिलाल भाेसले, संताेष भाेसले, विजयसिंह पिसाळ, संताेष ननावरे, जगदीश कांबळे, पाेपथ भाेसले, हणमंत कांबळे, पप्पुराजे भाेसले, बाळासाहेब कदम, सुनील दाभाडे, काेदे, गजानन जाधव, विनाेद कदम, सुमित वाघ, सुर्यकांत नायकवडी, राजकुमार पार्टे, प्रमाेद पिसाळ, शेखर भाेसले, विकास पिसाळ, अमर वाघ, मनाेज राऊत, सुनिल भिसे तसेच कंपनीचे अधिकारी व ग्रामस्थ माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. कार्यक्रम यशस्वितेसाठी अनशुमन जगदाळे, सुनिल पानसे, कुमार पवार यांनी यशस्वि प्रयत्न केले.
या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आणि गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे आभार मानले. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमधून गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा