Breaking

रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

तुळजापूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गरजू कुटूंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप तुळजापूर AJ 24 Taas News Maharashtra

*

तुळजापूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गरजू कुटूंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप 


तुळजापूर प्रतिनिधी /रूपेश डोलारे
उस्मानाबाद
*AJ 24 Taas  News Maharashtra

*वंचित बहुजन आघाडी चा सलग 156 दिवस उपक्रम वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा चे नूतन उपाध्यक्ष मा प्रवीण रानबागुल यांनी तुळजापूर येथील वंचित बहुजन आघाडी च्या धान्य वाटप उपक्रमास धावती भेट दिली या वेळेस त्यांचा सत्कार  करण्यात आला व त्यांचा हस्ते हस्ते 15 गरजूंना धान्य किट चे वाटप करण्यात आले*


उस्मानाबाद दि 13 सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मा प्रवीण रानबागुल (उपाध्यक्ष मराठवाडा वंचित बहुजन आघाडी) च्या हस्ते.15  गरजू कुटुंबांना किराणा  मालचे  वाटप दि 13 सप्टेंबर रोजी करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी च्यावतीने गरजू कुटूंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात येत असून आजचा156 वा दिवस आहे. तर आजपर्यंत 2798 कुटूंबांना अन्नधान्य वाटप केले आहे. 
वंचित बहुजन आघाडी , भारतीय बौद्ध महासभा, प्रबुद्ध कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन संस्था, कामठा,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था, उदगीर ,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व हितचिंतक दानशूर  यांच्या सहकार्याने व मिलिंद रोकडे   जीवन कदम सुरेश चौधरी विकास बनसोडे मार्गदर्शनाखाली हे वितरणप करण्यात येत आहे.या वाटपाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद रोकडे जीवन कदम,        सुरेश चौधरी                        किरण गायकवाड  ,दिनेश साळवे कृष्णा लोंढे सुरेश मस्के उपस्थित होते. सूत्रसंचालन राकेश तुळशीदास कदम  यांनी तर उपस्थितांचे आभार नागेश कदम  यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा